आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
'दबंग' फेम अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने अलीकडेच मुंबईतील वांद्रे येथे स्वतःचे 4 बीएचके अपार्टमेंट खरेदी केले आहे. वयाच्या तिशीपूर्वी स्वतःचे घर घेण्याचे सोनाक्षीचे स्वप्न होते. मात्र तिचे हे स्वप्न थोडे उशीरा का होईना पूर्ण झाले आहे. सोनाक्षीने नवीन घर खरेदी केले असले तरी ती आईवडिलांसह त्यांच्या घरी म्हणजेत रामायण येथेच राहणार आहे. सोनाक्षीपूर्वी अनेक तरूण कलाकार महागड्या घरांचे मालक झाले आहेत. चला जाणून घेऊया ते कलाकार कोण आहेत -
आलिया भट्ट
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने अलीकडेच तिचे दुसरे घर विकत घेतले आहे. तिचे हे नवीन घर वांद्रेमध्ये असून तिचा प्रियकर रणबीर कपूरच्या घराजवळ आहे. आलियाच्या या नवीन घराची किंमत तब्बल 38 कोटी असल्याचे सांगितले जात आहे. शाहरुख खानची पत्नी गौरी खान आलियाच्या घराचे इंटेरियर करत आहे. यापूर्वी आलियाने जुहूमध्ये एक फ्लॅट खरेदी केला होता. येथे ती तिची बहीण शाहीन भट्टसह राहते.
जान्हवी कपूर
2021 च्या सुरुवातीला अभिनेत्री जान्हवी कपूरने लक्झरी घर विकत घेतले आहे. तिच्या नवीन आणि आलिशान घराची किंमत 39 कोटी रुपये आहे. श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी हिने खरेदी केलेले घर एका इमारतीतील तीन मजल्यावर पसरले आहे. जुहू येथील हे घर 3,456 चौरस फूट आहे. नवभारत टाईम्सच्या वृत्तानुसार जान्हवीने या नवीन घरासाठी 78 लाख रुपये मुद्रांक शुल्क भरले आहे.
जॅकलिन फर्नांडिस
जॅकलिन फर्नांडिस हिनेदेखील अलीकडेच नवीन घर विकत घेतले आहे, जे तिच्या मागील घरापेक्षा खूप मोठे आहे. जॅकलिन स्वतःच तिच्या घराचे इंटेरियरचे काम हाताळत आहे. जॅकलिन अलीकडेच या नवीन घरात शिफ्ट झाली आहे. सध्या जॅकलिन तिच्या आगामी भूत पुलिस चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, ज्यामुळे ती सध्या घराच्या इंटेरियरवर लक्ष केंद्रित करू शकत नाहीये.
यामी गौतम
बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमने 2020 मध्ये मुंबईत घर विकत घेतले. आपल्या भव्य ड्युप्लेक्समध्ये यामी सध्या एकटी राहत आहे, या नवीन घरात लवकरच तिचे आई-वडीलही शिफ्ट होणार आहेत. यापूर्वी अभिनेत्रीने हिमाचल प्रदेशात एक जुने फार्म हाऊस खरेदी केले आहे.
अष्टपैलू अभिनेता आयुष्मान खुरानाने काही दिवसांपूर्वीच चंदीगडमध्ये आपल्या कुटुंबासाठी नवीन घर विकत घेतले आहे. त्याच्या नवीन घराची किंमत 9 कोटी आहे. शूटिंगनंतर आयुष्मान आता बहुतेक वेळ आपल्या घरात घालवतोय. आयुष्मान, त्याची पत्नी ताहिरा, मुले, भाऊ अपारशक्ती खुराना, त्याची पत्नी आणि अभिनेत्याचे आई-वडील सर्व या घरात शिफ्ट झाले आहेत.
'मिर्जापूर' फेम अभिनेता विक्रांत मेसीने 2020 च्या दिवाळीमध्ये नवीन घर विकत घेतले आहे. सध्या या घराचे इंटेरियरचे काम सुरू आहे. 2020 मध्ये गर्लफ्रेंडसह साखरपुड्यानंतर विक्रांतने त्याच्या नवीन घराबद्दल सोशल मीडियावरुन माहिती दिली होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.