आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मदतीचा हात:गरजुंच्या मदतीसाठी पुढे आली सोनाक्षी सिन्हा, स्वत: च्या हातांनी बनवलेल्या कलाकृतींचा लिलाव करुन उभारणार निधी

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोनाक्षी तिने रेखाटलेले चित्र, डिजिटल प्रिंट्स याचा लिलाव करणार असून त्यातून जमा होणारी रक्कम ती गरजुंच्या मदतीसाठी वापरणार आहे.

लॉकडाऊनमुळे रोजंदारी मजुरी करणारे अनेक लोक मोठ्या संकटाचा सामना करत आहेत. अशा परिस्थितीत अनेक कलाकार पुढे आले असून ते गरजुंना आपापल्या परीने मदत करत आहेत. आता या यादीत अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या नावाचाही समावेश झाला आहे. सोनाक्षीने गरजुंना मदत करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. फ्रॅकाइंड यांच्यासोबत मिळून तिने एक नवीन पुढाकार घेतला आहे, ज्यामध्ये ती स्वत: च्या हातांनी बनवलेल्या कलाकृतींचा लिलाव करुन निधी उभारणार आहे. यात ती रेखाटलेले चित्र, डिजिटल प्रिंट्स याचा लिलाव करणार असून त्यातून जमा होणारी रक्कम ती गरजुंच्या मदतीसाठी वापरणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सोनाक्षीने ही माहिती दिली आहे. सोनाक्षीचा पुढाकार पाहून तिचे इंडस्ट्रीतील मित्रदेखील पाठिंब्यासाठी पुढे आले आहेत.

अलीकडेच सोनाक्षी सिन्हाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून माहिती देणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्यांनी सांगितले की, “मी फ्रॅकाइंड ऑफिशियलच्या मदतीने एक टीम तयार केली आहे. ही टीम मी रेखाटलेले चित्र, पेटिंग्ज यांचा लिलाव करतील आणि त्यातून जमा होणारी रक्कम गरजुंसाठी वापरतील. या रक्कमेमधून आम्ही गरजू लोकांसाठी अन्नधान्य पुरवणार आहोत. या सर्व कलाकृती मी एका वर्षात स्वत: तयार केल्या आहेत''.  

बॉलिवूड सेलिब्रिटींनी दिला पाठिंबा

सोनाक्षी सिन्हाचा पुढाकार पाहून आलिया भट्ट, करण जोहर, दीया मिर्झा, गुलशन ग्रोव्हर, वरुण शर्मा, मनीष पॉल आणि कृती सेनॉन यासारख्या अनेक स्टार्सनी तिचे कौतुक केले आहे.

फ्रॅकाइंड म्हणजे काय?

फ्रॅकाइंड हे एक निधी उभारण्यासाठी तयार करण्यात आलेले व्यासपीठ असून ते अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूरने सुरु केले आहे. या माध्यमातून ती सेलेब्सच्या मदतीने गरजूंना मदत करते. सोनाक्षी सिन्हापूर्वी अर्जुन कपूर, विक्की कौशल, कार्तिक आर्यन, जान्हवी कपूर यांनीही वेगवेगळ्या प्रकारे मदत केली आहे.

बातम्या आणखी आहेत...