आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोशल मीडिया:बुधवारी 'संडे सेल्फी' शेअर केल्याने ट्रोल झाली सोनाक्षी सिन्हा, लोक म्हणाले- 'तुम्ही रामायणातील व्यक्तिरेखाही विसरल्या होत्या'

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्या काही दिवसांपासून सोनाक्षीला सतत ट्रोलर्सचा सामना करावा लागतोय.

लॉकडाऊन सुरु झाल्यापासून सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. अलीकडेच सोनाक्षीने एक सुंदर सेल्फी शेअर केली आहे, पण त्यासोबत लिहिलेल्या कॅप्शनमुळे तिला पुन्हा एकदा ट्रोलर्सचा सामना करावा लागला आहे.

झाले असे की, सोनाक्षी सिन्हाने बुधवारी आपल्या ट्विटर अकाउंटवर एक सेल्फी शेअर करताना लिहिले की, 'संडे सेल्फी... कारण आज कोणता दिवस आहे हे मला आठवत नाहीये. कोरोनाच्या काळातील जीवन. लॉकडाउन लाइफ.' 

हे छायाचित्र शेअर केल्यापासून सोनाक्षी  ट्रोल होऊ लागली. एका यूजरने हे कॅप्शन रामायणाशी जोडले आणि म्हणाले, 'ठीक आहे, तुम्ही रामायणचे पात्रसुद्धा विसरल्या होत्या'. आणखी एकाने लिहिले, 'ही रामायण विसरल्यानंतर आता तारीखदेखील विसरली आहे'.

लोकांनी रामायण बघण्याचा सल्ला दिला

'केबीसी 11' मध्ये पाहुणी म्हणून  सहभागी झालेल्या सोनाक्षीला हनुमानजी संजीवनी बूटी कुणासाठी आणतात, हे ठाऊक नव्हते. ती केबीसीमध्ये प्रश्नाचे उत्तर देऊ शकली नव्हती. तेव्हापासून सोनाक्षीला ट्रोलर्स ट्रोल करत आहेत. या संदर्भात अनेकदा आपले स्पष्टीकरण देणा-या सोनाक्षीला लोक सतत रामायणचे पुनःप्रक्षेपण बघण्याचा सल्ला देत आहेत.

बातम्या आणखी आहेत...