आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Sonakshi Sinha Turned Heroine From Fashion Designer, As Soon As Dabang Became A Hit, Her Father's Looks Compared To Her Ex Girlfriend Reena Rai

सोनाक्षी सिन्हाचा 34 वा वाढदिवस:फॅशन डिझायनर ते अभिनेत्री... 'दबंग' हिट होताच वडिलांची एक्स-गर्लफ्रेंड रिना रॉयसोबत झाली होती तुलना

17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'शॉटगन' या नावाने प्रसिद्ध असलेले शत्रुघ्न सिन्हा यांची सोनाक्षी धाकटी मुलगी आहे.

बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा आज (2 जून) आपला 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. 2 जून 1987 रोजी बिहारच्या पटना शहरात अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या घरी सोनाक्षीचा जन्म झाला. ती बी टाऊनच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. 'शॉटगन' या नावाने प्रसिद्ध असलेले शत्रुघ्न सिन्हा यांची सोनाक्षी धाकटी मुलगी आहे. सोनाक्षीसह शत्रुघ्न यांना दोन जुळी मुले असून लव आणि कुश ही त्यांची नावे आहेत. सोनाक्षीच्या आईचे नाव पूनम सिन्हा आहे. पूनम सिन्हा यांनी 'जिगरी दोस्त'(1968), 'आदमी और इंसान'(1969), शैतान (1974), ड्रीम गर्ल' (1977) आणि 'जोधा अकबर' (2008) या सिनेमांमध्ये काम केले आहे.

मुंबईत झाले शिक्षण
सोनाक्षीचे शालेय शिक्षण मुंबईतील आर्य विद्या मंदिरमध्ये झाले. त्यानंतर तिने श्रीमती नाथीबाई दामोदरदास ठाकरे युनिव्हर्सिटीमधून तिने फॅशन डिझायनिंगचे शिक्षण पू्र्ण केले.

दबंगसाठी सोनाक्षीने तिचे 30 किलो वजन कमी केले होते.
दबंगसाठी सोनाक्षीने तिचे 30 किलो वजन कमी केले होते.

'दबंग'द्वारे झाली बी टाऊनमध्ये एन्ट्री
बॉलिवूडमध्ये 'दबंग गर्ल' या नावाने प्रसिद्ध असलेल्या सोनाक्षीने 2010 मध्ये 'दबंग' सिनेमाद्वारे बॉलिवू़डमध्ये एन्ट्री घेतली. या सिनेमात सलमान खान तिचा को-स्टार होता. त्यानंतर सोनाक्षीने 'राउडी राठौर', 'सन ऑफ सरदार', 'दबंग -2', 'लुटेरा', 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा', 'बुलेट राजा', आणि 'आर राजकुमार' या हिट सिनेमांत अभिनय केला. याशिवाय तिने 'हॉलिडे : अ सोल्जर इस नेवर ऑफ ड्यूटी', 'अॅक्शन जॅक्सन', 'तेवर', 'अकीरा' या सिनेमांमध्येही अभिनय केला आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्यासह 'लिंगा' या सिनेमातसुद्धा सोनाक्षी झळकली आहे.

रीना रॉयशी झाली होती तुलना
सोनाक्षीने सिनेसृष्टीत पदार्पण केल्यानंतर तिची तुलना एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री रीना रॉयसोबत करण्यात आली. अभिनेते आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा यांची लाडकी लेक सोनाक्षी सिन्हा हुबेहुब रीना रॉयसारखी दिसते, असे म्हटले गेले. त्यामुळे सोनाक्षी आणि तिची आई पूनम सिन्हा खूप नाराज झाल्या होत्या.

रीना रॉयशी सोनाक्षीची तुलना होण्यामागचे हे होते कारण
रीना रॉय यांच्याशी सोनाक्षीची तुलना होण्यामागे एक कारण म्हणजे, एकेकाळी रीना रॉय आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यात जवळीक होती. शिवाय पूनम सिन्हा यांच्यासोबत लग्नानंतरसुद्धा शत्रुघ्न सिन्हा रीना रॉयला भेटायचे.

रीना रॉय आणि शत्रुघ्न सिन्हा यांचे बराच काळ अफेअर राहिले होते.
रीना रॉय आणि शत्रुघ्न सिन्हा यांचे बराच काळ अफेअर राहिले होते.

खास इंडियन लूकमुळे सोनाक्षीचा चेहरा माझ्यासारखा: रीना
सोनाक्षीचा चेहरा रीना रॉय यांच्याशी मिळताजुळता असल्याचे अडचणी निर्माण झाल्या होत्या. इतकेच नाही तर पाकिस्तानी क्रिकेटर मोहसिन खानपासून विभक्त झाल्यानंतर मुलगी सनमसोबत राहणा-या रीना रॉय यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचली तेव्हा त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन या सर्व वृत्तांचे खंडन केले. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत रीना यांनी म्हटले होते, की सोनाक्षीचा चेहरा तिची आई पूनम सिन्हाशी मिळता-जुळता आहे. 'दबंग' या सिनेमात सलमान खानने सोनाक्षीला भारतीय लूक दिला होता, त्यामुळे कदाचित तिचा चेहता माझ्याशी मिळत असावा.

बातम्या आणखी आहेत...