आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मदतीचा हात:सोनाली रुग्णालयाला मदत करून साजरा करणार वाढदिवस, म्हणाली - या संकट समयी माझ्याकडून जेवढं शक्य आहे ते मी करायचा प्रयत्न करत आहे

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोनालीने एक उत्कृष्ट आयडिया फॅन्सना आणि तिच्या जवळच्या सर्व मित्र मंडळी आणि कुटुंबियांना सांगितली.

कोरोनाच्या संकटाच्या काळात कलाकार आपापल्या परीने मदतीचा हात पुढे देत आहेत. बॉलिवूडसोबतच मराठी कलाकारही यात मागे नाहीत. येत्या 18 मे रोजी मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा वाढदिवस आहे. यंदाचा वाढदिवस सोनालीने अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. सोनालीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक अनोखे गिफ्ट यशवंत राव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल पिंपरी पुणे हॉस्पिटल हॉस्पिटलला दिले जाणार  आहे.   

सोनाली तिच्या चाहत्यांशी नेहमीच संपर्कात असते. जेव्हा तिच्या फॅन्सनी सोनालीला आपण लॉकडाऊनमधील वाढदिवस कसा साजरा करणार त्याबद्दल विचारले असता सोनालीने एक उत्कृष्ट आयडिया फॅन्सना आणि तिच्या जवळच्या सर्व मित्र मंडळी आणि कुटुंबियांना सांगितली. ही आयडिया अशी होती की, सर्वानी सोनालीला गिफ्ट म्हणून वस्तू देण्याऐवजी सर्वांनी पैसे जमवायचे. जेवढे पैसे जमतील तेवढेच आणखी पैसे सोनाली स्वतःच्या अकाऊंटमधून जमवलेल्या पैशांमध्ये भर करेल आणि जमलेल्या सर्व पैशांचे एका हॉस्पिटल स्टाफला लागणारे पीपीआय किट तिच्या वाढदिवसानिम्मित दिले जाईल. सर्वांनाचं सोनालीची ही कल्पना आवडली आणि सर्वांनी सढळ हस्ते पैसे दिले. 

सोनाली सध्या जज करत असलेली झी युवा वाहिनीवरील युवा डान्सिंगची टीम, धुराळा चित्रपटाची टीम, हिरकणीची टीम, सोनालीचे इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार मित्र मंडळी, कुटुंबातील अनेकजण आणि सोनालिअन्स या सर्वानी मिळून नेहमी प्रमाणे गिफ्ट न देता पैसे जमवले आणि त्यात तेवढ्याच पैशाची भर घालत या किट्सची खरेदी केली गेली आणि सोनालीच्या कल्पनेला खरे स्वरूप आले. आता 18 मे रोजी ही उपयुक्त भेट यशवंत राव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल पिंपरी पुणे हॉस्पिटलला दिली जाईल.

याविषयी सोनालीने सांगितले, “या संकट समयी माझ्याकडून जेवढं शक्य आहे ते मी करायचा प्रयत्न करत आहे. जिथे पैशांची मदत करण्याची गरज होती तीसुद्धा मी वेळोवेळी केली आहे. वाढदिवस प्रत्येक वर्षी येतो आणि गिफ्टसुद्धा, मात्र यावेळी मला रिटर्न गिफ्ट द्यायचं आहे आणि मी समाधानी आहे की, माझ्या हक्काच्या मंडळींनी मला यासाठी पूर्णपणे साथ दिली आणि यावर्षीचा माझा वाढदिवस माझ्या कायम लक्षात राहील.”

बातम्या आणखी आहेत...