आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमबॅक:'द ब्रोकन न्यूज’ सिरीजमधून ओटीटीवर येणार सोनाली बेंद्रे, सोशल मीडियावर शेअर करुन दिली माहिती

मुंबई9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोनाली बेंद्रे लवकरच झी-फाईव्ह वरील मालिका ‘द ब्रोकन न्यूज’मधून ओटीटीवर पदार्पण करणार आहे. विनय वैकुल दिग्दर्शित फेमस ब्रिटिश मालिका ‘प्रेस’ची सुधारित आवृत्ती आहे. यामध्ये सोनालीव्यतिरिक्त जयदीप अहलावत, श्रिया पिळगावकर, इंद्रनील सेनगुप्ता, तारुक रैना, आकाश खुराणा आणि किरणकुमार दिसणार आहेत. सोनालीने या मालिकेचा एक छोटा व्हिडिओ सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले...

‘सेटवर परत येणे, सर्जनशीलतेत परत येणे, माझे सहकलाकार आणि दिग्दर्शकांशी संवाद साधणे, व्यक्तिरेखेत जिवंतपणा आणणे, खूप छान वाटते. झी-फाईव्ह सह ओटीटीवर पदार्पण करताना मला खूप आनंद होत आहे. आम्ही एकत्र खूप काही केले आणि ते कुटुंबासारखे वाटते.” निर्मात्यांच्या मते, या शोमध्ये मुंबईतील दोन प्रतिस्पर्धी न्यूज चॅनलची कथा आहे. सोनाली शेवटची 2013 मध्ये वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा या चित्रपटात दिसली होती.

तसेच नेटफ्लिक्सवर अलीकडेच प्रसारित झालेल्या 'आरण्यक' या क्राईम-थ्रिलर मालिकेचेही दिग्दर्शन विनय वैकुल यांनी केले होते. कॅन्सरवर मात केल्यानंतर सोनाली 'इंडियन आयडॉल' आणि 'इंडियाज गॉट टॅलेंट' सारख्या टेलिव्हिजन शोमध्ये जज म्हणून दिसली आहे.

बातम्या आणखी आहेत...