आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाच्या विळख्यात बॉलिवूड:सोनाली सहगलला कोरोनाची लागण, म्हणाली – मी आयसोलेशनमध्ये असून बरी होत आहे

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मला माझ्या प्रतिकारशक्तीचा खूप अभिमान वाटायचा - सोनाली सहगल

अभिनेत्री सोनाली सहगलला कोरोनाची लागण झाली आहे. सोनालीने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. सध्या आयसोलेशनमध्ये असून बरी होत असल्याचे तिने सांगितले आहे. यासोबतच गेल्या काही दिवसांत तिच्या संपर्कात आलेल्या लोकांनाही तिने कोविड चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

कोविड पुन्हा आपल्या आयुष्यात डोकावत आहे
सोनाली सहगलने तिचे दोन फोटो शेअर केले आणि लिहिले की, "2 वर्षांपूर्वी कोरोना विषाणूच्या संपर्कात आल्यानंतर, आता मी पुन्हा एकदा आयसोलेशनमध्ये असून बरी होत आहे. कोविड आपल्या आयुष्यात पुन्हा घुसखोरी करत आहे. त्यामुळे सर्वांनी मास्क घाला. ही लढाई आणखी लांबणार आहे. पण, ही लढाई आपण जिंकूच. खंबीर राहा आणि सुरक्षित रहा," असे सोनाली म्हणाली आहे.

मला माझ्या प्रतिकारशक्तीचा खूप अभिमान वाटायचा
सोनालीने तिच्या नोटमध्ये पुढे लिहिले, 'मला माझ्या प्रतिकारशक्तीचा खूप अभिमान वाटायचा आणि मी क्वचितच आजारी पडते, असे मी म्हणायचे. पण, या विषाणूची लागण झाल्यानंतर आता मला ताप आला आहे आणि तो अनेक वर्षांनी आला आहे. ही अजिबात चांगली भावना नाहीये आणि हा विषाणू प्रत्येक प्रकारे भयंकर आहे. पण तरीही भरपूर लिक्विड, जीवनसत्त्वे, औषधे, ध्यान आणि प्रार्थना तुम्हाला त्यातून बाहेर पडण्यास मदत करतील.”

सोनाली सहगलच्या आधी अभिनेता शाहरुख खान, कतरिना कैफ, कार्तिक आर्यन, आदित्य रॉय कपूर आणि अक्षय कुमार कोविड पॉझिटिव्ह झाले होते.

बातम्या आणखी आहेत...