आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'झक्कास' बातमी!:चिरतरुण अनिल कपूर झाला आजोबा, सोनम कपूरला पुत्ररत्न, इन्स्टाग्रामवर दिली माहिती

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आई झाली आहे. सोनमने बिझनेसमन आनंद आहुजासोबत लग्न केले होते. सोनमने तिच्या इन्स्टाग्रामवर मुलाच्या जन्माची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, सोनमची मुंबईतील एका खासगी रुग्णालयात प्रसूती झाली. सोनमने मार्चमध्ये गर्भधारणेची घोषणा केली होती. ती अलीकडेच 'कॉफी विथ करण' या शोमध्ये तिचा चुलत भाऊ अर्जुन कपूरसोबत दिसली होती.

सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मुलाच्या जन्माची घोषणा केली.
सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मुलाच्या जन्माची घोषणा केली.

सोनम-आनंद म्हणाले- आमचे आयुष्य कायमचे बदलले

सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांनी इन्स्टाग्रामवर एक स्टेटमेंट शेअर केले आहे. त्यात लिहिले आहे - 20.08.2022 रोजी आम्ही आमच्या सुंदर मुलाचे स्वागत केले. या प्रवासात आम्हाला पाठिंबा देणाऱ्या सर्व डॉक्टर, परिचारिका, मित्र आणि कुटुंबीयांचे आभार. ही फक्त सुरुवात आहे, परंतु आम्हाला माहितीये की आमचे जीवन कायमचे बदलले आहे.

मे 2018 मध्ये सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांच्या लग्नातील हा फोटो आहे.
मे 2018 मध्ये सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांच्या लग्नातील हा फोटो आहे.

सोनम आणि आनंद यांचे 2018 मध्ये झाले होते लग्न

मे 2018 मध्ये या जोडप्याचे लग्न झाले होते, सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांनी 8 मे 2018 रोजी लग्न केले होते. या लग्नाला सोनमचे मित्र आणि कुटुंबीयांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या वर्षाच्या सुरुवातीला या जोडप्याने त्यांच्या गर्भधारणेची घोषणा केली होती.

या जोडप्याने प्रेग्नेंसीची घोषणाही सोशल मीडियावर केली होती.
या जोडप्याने प्रेग्नेंसीची घोषणाही सोशल मीडियावर केली होती.

प्रेग्नन्सीची घोषणा करताना या जोडप्याने फोटो शेअर करत लिहिले होते की, 'आम्ही चार हातांनी तुला सावरण्यासाठी आमचे बेस्ट देऊ. दोन हृदये. जे प्रत्येक पावलावर तुमच्यासोबत, एक कुटुंब, जे तुम्हाला प्रेम आणि समर्थन देईल. आम्ही तुमचे स्वागत करण्यास उत्सुक आहोत.'

बातम्या आणखी आहेत...