आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेत्री सोनम कपूर मंगळवारी (9 जून) मुंबईत आपला 35 वा वाढदिवस साजरा करीत आहे. अलीकडेच ती दोन महिन्यांनंतर दिल्लीहून आपल्या माहेरी आली आहे. यावेळी दिव्य मराठीने सोनमचा चुलत भाऊ आणि अभिनेता अर्जुन कपूर व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपट 'नीरजा'चे दिग्दर्शक राम माधवानी यांच्याशी खास बातचीत केली.
आपल्या बहिणीविषयी बोलताना अर्जुन म्हणाला, 'सोनमला बालपणापासूनच पुस्तके वाचण्याची खूप आवड आहे.तिची ही सवय खूप प्रेरणादायक आहे. चांगली गोष्ट म्हणजे तिची ही सवय लहानपणापासून ते आजपर्यंत कायम आहे. मला तिचा हा अभ्यासू स्वभाव खूप आवडतो, असे अर्जुनने सांगितले.
सोनम एक पुस्तकी किडा आहे
अर्जुन पुढे म्हणाला, 'बालपणी ती चार ते पाच पुस्तके केवळ दोन-तीन दिवसांत वाचून पूर्ण करायची. तिच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग मला कायम आठवण करून देतो की माझी एक मोठी चश्मिश बहीण आहे, जी एक पुस्तकी किडा आहे.'
चित्रपटांमध्ये ग्लॅमरस, परंतु प्रत्यक्षात अगदी सामान्य
'जे तिला जवळून ओळखत नाही त्यांच्यासाठी सोनम फक्त एक अभिनेत्री आहे, पण खरं सांगायचं तर ती खूप संवेदनशील व्यक्ती आहे. ती चित्रपटांमध्ये कितीही ग्लॅमरस असू देत पण ख-या आयुष्यात ती अतिशय साधी आहे', असेही अर्जुनने आवर्जुन सांगितले.
माधवानी म्हणाली- मी तिच्या कामाचा चाहता आहे
यावेळी 'नीरजा' या चित्रपटाचे दिग्दर्शक राम माधवानी म्हणाले, 'नीरजा'च्या भूमिकेसाठी आमचे सह-निर्माते अतुल कसबेकर यांच्या मनात सोनम कपूरचे नाव होते. मी स्वत: सोनमच्या कामाचा चाहता आहे. सुदैवाने तिने या चित्रपटात काम करण्यास सहमती दर्शविली.'
या चित्रपटासाठी एअर होस्टेसचे घेतले होते प्रशिक्षण
पुढे माधवानी म्हणाले, 'चित्रपटाची कल्पना ऐकल्यानंतर सोनम आमच्याबरोबर चंदीगडला आली आणि नीरजाच्या कुटुंबाची भेट घेतली. तिथल्या पहिल्या भेटीत नीरजाची आई सोनमला पाहून म्हणाल्या होता, "असे वाटते की नीरजा आली आहे. पण हो, माझी मुलगी जरा जास्तच सुंदर होती." चित्रपटाच्या शूटिंगपूर्वी सोनमने दररोज 10 ते 12 तास एअर होस्टेसची ट्रेनिंग घेतली होती. आम्ही या चित्रपटाची शूटिंग अत्यंत आत्मियतेने पूर्ण केली होती.'
खूप काळजी घेणारी आहे सोनम कपूर
माधवानी पुढे म्हणाले, ''मला आठवतंय, 'नीरजा'च्या पत्रकार परिषदेच्या आदल्या रात्री सोनम मला म्हणाली होती की, राम एक रुमाल आपल्याजवळ ठेवा. कारण पत्रकार परिषदेत समोरून कॅमे-याचे खूप लाइट्स येतात, त्यामुळे चेह-यावर घाम फुटत राहतो. तेव्हा घाम पुसायला रुमालाची गरज भासेल. याचा अर्थ असा आहे की, ती लोकांची खूप काळजी घेते.''
'सोनमबरोबर काम करताना वाटले की मोठी बहीण माझी काळजी घेत आहे. माझा 5 जून रोजी वाढदिवस होता, तिने आठवणीने माझ्यासाठी फुले पाठवली. कदाचित तिला या गोष्टी वडिलांकडून वारसा म्हणून मिळाल्या असतील', असेही राम माधवानी म्हणाले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.