आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Sonam Kapoor Gets Trolled For Asking Work On Birthday Post From Anurag Kashyap, Netizens Says, 'atleast Dont Ask This Today, No One Will Wish You Next Time'

सोशल मीडिया:अनुराग कश्यपकडे वाढदिवशी काम मागितल्याने ट्रोल झाली सोनम कपूर, नेटकरी म्हणाले- 'धन्यवाद देणाच्या निमित्ताने कामही मागितले'

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोशल मीडियावर लोक कधी कुणाला कशावरुन ट्रोल करतील याचा काही नेम नाही. यावेळी सोनम कपूरला नेटक-यांनी लक्ष्य केले आहे.
Advertisement
Advertisement

अभिनेत्री सोनम कपूरने मंगळवारी मुंबईत तिचा 35 वा वाढदिवस साजरा केला. या खास प्रसंगी  अनेक सेलिब्रिटींनी तिला शुभेच्छा देताना बर्थडे पोस्ट शेअर केली होती. दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनीही सोनमला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याला उत्तर देताना सोनमने अनुराग कश्यपबरोबर काम करण्याची उत्सुकता दाखवली, ज्यामुळे नेटकरी तिला आता सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. 

अनुराग कश्यप यांनी ट्विटरवर लिहिले आहे, 'मुली वाढदिवसाच्या शुभेच्छा'. याच्या उत्तरात सोनमने लिहिली, 'थँक्यू डार्लिंग अनुराग, मी तुझ्याबरोबर काम करण्याची वाट पाहू शकत नाही'. हे पाहून लोकांनी दोघांनाही ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

एका नेटक-याने ट्विट केले की, “एक अप्रतिम चित्रपट येईल ज्याचे दिग्दर्शक कश्यप आणि अभिनय सोनमचा असेल .. एकाच्या दिग्दर्शनाची तर दुसर्‍याच्या अभिनयाची चर्चा संपूर्ण विश्वात आहे.' आणखी एका नेटक-याने लिहिले, “तुम्हाला फ्लॉप व्हायचे असेल तर अनुराग कश्यपशी नक्की संपर्क साधा. आणि एकदा तू दीपिकाशीही बोलून तर बघ कदाचित तुझ्यावर कृपा होईल.'

ट्विटरवर एका नेटक-याने अनुरागला बेरोजगार म्हणत लिहिले, "तो स्वत: बेरोजगार आहे म्हणून तो तुला एखाद्या चित्रपटात कास्ट करू शकेल असं मला वाटत नाही. तू स्वत: एखाद्या चित्रपटाची निर्मिती केल्यास त्याला काम दे. ' त्याच वेळी, इतरांनी लिहिले, 'पहा, धन्यवाद देणाच्या निमित्ताने कामही मागितले.' 

वाढदिवसाच्या पोस्टवर काम मागितल्याने सोनमची चेष्टा करताना एका व्यक्तीने लिहिले, 'आजचा दिवस तर सोडून द्यायला हवा होता, आता कुणी शुभेच्छा देणार नाही.' 

अनुराग कश्यप दिग्दर्शित ‘चोक्ड’ हा चित्रपट 5 जून रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. यापूर्वी त्याने 'घोस्ट स्टोरीज' दिग्दर्शित केला होता जो एक हॉरर चित्रपट होता. सोनम कपूर शेवटची 'झोया फॅक्टर'मध्ये दिसली होती. त्यानंतर सोनमने अद्याप कोणत्याही नवीन प्रोटेक्ट स्वीकारलेला नाही. लॉकडाऊन झाल्यापासून ही अभिनेत्री आपल्या पतीसमवेत दिल्लीत होती, पण वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच ती मुंबईत आली आहे.  

Advertisement
0