आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुड न्यूज:लग्नाच्या 4 वर्षांनंतर आई होणार आहे सोनम कपूर, बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचा फोटो केला शेअर

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोनमने शेअर केलेल्या फोटोत तिचे बेबी बंप दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर लग्नाच्या 4 वर्षानंतर आई होणार आहे. ही आनंदाची बातमी सोनमने तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका सुंदर छायाचित्र शेअर करत दिली आहे. सोनमने शेअर केलेल्या फोटोत तिचे बेबी बंप दिसत आहे.

सोनमने सोमवारी इन्स्टाग्राम अकाउंटवरून ती आई होणार असल्याची बातमी दिली आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये ती म्हणते, 'आम्ही तुझे स्वागत करण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही.'

छायाचित्रात सोनम तिचा नवरा आनंद आहुजासोबत दिसतेय. यात ती बेबी बंपसोबत पोज देताना दिसत आहे. फोटो समोर येताच चाहते आणि मित्र या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. करीना कपूरने लिहिले, मी तुम्हा दोघांसाठी खूप आनंदी आहे.

सोनम कपूरने 2018 मध्ये बिझनेसमन आनंद आहुजासोबत लग्न केले. लग्नानंतर सोनम कपूर चित्रपटांपासून दूर कौटुंबिक जीवनाचा आनंद घेत आहे. सोनम शेवटची 'द झोया फॅक्टर' या चित्रपटात दिसली होती.

बातम्या आणखी आहेत...