आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

प्रतिक्रिया:सुशांतच्या मृत्यूसाठी गर्लफ्रेंड आणि सहका-यांना दोषी ठरवल्याने सोनम कपूर, सोनाक्षी सिन्हा भडकल्या; नूूपूर सेनॉनदेखील व्यक्त केला रोष 

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांतने 14 जून रोजी आत्महत्या केली.
Advertisement
Advertisement

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने रविवारी मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूची बातमी समजताच सर्वत्र खळबळ उडाली. सोशल मीडियावर बर्‍याच लोकांनी त्याच्या मृत्यूसाठी त्याची गर्लफ्रेंड, एक्स-गर्लफ्रेंड, कुटंबीय आणि सहका-यांना दोष देण्यास सुरुवात केली.

इतकेच नाही तर सोशल मीडियावर बॉलिवूडमध्ये नेपोटिझम, स्टारकिड्सला मिळणारे महत्त्व यावरुन चर्चा देखील सुरू झाली आहे.. लोक गटबाजीवरुन बॉलिवूडचे मोठे कॅम्प,  निर्माता-दिग्दर्शक आणि कलाकारांना खडे बोल सुनावत आहेत. हे पाहून सोनम कपूर संतापली आहे.

तिने ट्विटरवर लिहिले की, 'एखाद्याच्या मृत्यूवर त्याची गर्लफ्रेंड, एक्स-गर्लफ्रेंड, कुटुंब, त्याच्यासोबत काम करणा-यांना दोष देणे हे अज्ञान आहे.

सोनाक्षी सिन्हा संतापली : सोनाक्षीने इंस्टाग्रामवर लिहिले की, 'असे काही निवडक आहेत जे एखाद्या मृत्यूचा फायदा उचलून स्वतःचा प्रचार करत आहेत. हे सर्व थांबवा. आपली नकारात्मकता, द्वेष आणि विषाची गरज नाही. जे हे जग सोडून गेले आहे, त्यांचा तुम्ही सन्मान केला पाहिजे.'

सोनाक्षीने आपल्यापोस्टमध्ये कोणाचेही नाव घेतले नाही परंतु तिचा रोख कंगना रनोटकडे होता, जिने एक व्हिडीओ प्रसिद्ध करुन सुशांतच्या मृत्यूसाठी करण जोहरला दोषी ठरवले आहे.

क्रिती सेनॉनची बहीण नूपूरने संताप व्यक्त केला : सुशांतच्या मृत्यूवर प्रतिक्रिया न दिल्यामुळे राब्तामधील त्याची को-स्टार राहिलेली क्रिती सेनॉनही ट्रोल झाली. यानंतर तिची बहीण नुपूरने इन्स्टाग्रामवर लिहिले की, 'अचानक सगळेच सोशल मीडियावर मानसिक आरोग्याबद्दल बोलू लागले. मग लोकांनी वाईट ट्विट, मेसेजेस, कमेंटद्वारे सध्या जबर मानसिक धक्क्यात आसलेल्या लोकांना त्रास देणे सुरू केले. आपण किती निर्दयी आहात, एक देखील पोस्ट टाकली नाही. अशा प्रतिक्रिया आम्हाला मिळत आहेत. तुमची परवानगी असेल तर आम्ही रडू शकतो का? प्लीज?, अशा शब्दांत नूपूरने रोष व्यक्त केला आहे. 

Advertisement
0