आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'ब्लाइंड'च्या शूटिंगला सुरुवात:सोनम कपूरने स्कॉटलंडमध्ये सुरु केले आगामी चित्रपटाचे चित्रीकरण, अंध पोलिस अधिका-याची साकारणार भूमिका

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तरण आदर्श यांनी दिली माहिती

अभिनेत्री सोनम कपूरने तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाला स्कॉटलंडच्या ग्लासगो येथे सुरुवात केली आहे. 'ब्लाइंड' हे तिच्या आगामी चित्रपटाचे नाव असून हा चित्रपट याच शीर्षकाच्या हिट कोरिअन अ‍ॅक्शन थ्रिलरचा हिंदी रिमेक आहे. यात सोनमसह पूरब कोहली आणि विनय पाठक देखील एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

अंध महिला पोलिसावर आधारित चित्रपट
'ब्लाइंड' ही अशा एका महिला पोलिस अधिका-याची कथा आहे, जिचे कार अपघातात दोन्ही डोळे निकामी होतात. त्यानंतर ती स्वत:चा एक वेगळा सेंस विकसित करते आणि पोलिसांना मदत करते. या चित्रपटाचे दिग्दर्शन शोम मखीजा करत आहेत.

तरण आदर्श यांनी दिली माहिती
चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी या चित्रपटाविषयी माहिती देणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. एक फोटो पोस्ट करत त्यांनी लिहिले, "सोनम कपूरच्या क्राइम थ्रिलरच्या चित्रीकरणाला स्कॉटलंडच्या ग्लासगो येथे सुरुवात झाली आहे. सीरियल किलरच्या शोधात एका अंध पोलिस अधिका-याची कहाणी."

फ्लॉप चित्रपटाने झाली होती सोनमच्या करिअरची सुरुवात
सोनमचा 'सावरिया' हा पहिलाच चित्रपट फ्लॉप झाला होता. पण निराश होण्याऐवजी ती खूप मेहनत करत राहिली. यानंतर सोनम 'दिल्ली 6', 'रांझणा', 'भाग मिल्खा भाग', 'प्रेम रतन धन पायो', 'नीरजा', 'पॅडमॅन', 'वीरे दी वेडिंग' आणि 'संजू' सारख्या चित्रपटांमध्ये दिसली आहे.

बातम्या आणखी आहेत...