आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्रोलिंग:नेटकऱ्यांनी सोनम कपूरच्या गाऊनची तुलना सोफा कव्हरशी केली, फॅशन ब्लॉगरने सांगितला या आउटफिटमागील इतिहास

21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

किंग चार्ल्स III यांच्या राज्याभिषेकाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 7 मेच्या रात्री विंडसर कॅसल येथे एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कॉन्सर्टमध्ये बॉलिवूडमधून अभिनेत्री सोनम कपूरने हजेरी लावली होती. यादरम्यान सोनम कपूरने कॉमनवेल्थ देशांच्या व्हर्च्युअल परफॉर्मन्सची ​​​​​ ओळख करून देताना भाषणही केले. सोनमने कार्यक्रमात खास गाऊन परिधान केला होता. तिचा हा आउटफिट भारताच्या फॅशन डिझायनर अनामिका खन्ना आणि ब्रिटनच्या एमिलिया विकस्टेड यांनी संयुक्तपणे तयार केला.

आजही भारत-पाकिस्तानमध्ये स्प्लॅश प्रिंटचे कपडे घातले जातात: फॅशन ब्लॉगर
या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर समोर आल्यानंतर लोकांनी सोनम कपूरच्या ड्रेसची तुलना बेडशीट, वॉलपेपर आणि सोफा कव्हरसोबत केली. नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला ट्रोल करण्याची संधी सोडली नाही. पण आता फॅशन ब्लॉगर आमिरने ट्रोलर्सचे तोंड बंद करणारी एक पोस्ट शेअर केली आहे. सोनमच्या ड्रेसच्या निवडीबद्दल स्पष्टीकरण देताना आमिरने सांगितले की, आजही भारत आणि पाकिस्तानमधील अनेक डिझायनर्स त्यांच्या कपड्यांवर स्प्लॅश डिझाइन वापरतात परंतु त्यांना या प्रिंटच्या इतिहासाबद्दल माहिती नसते. आता ही प्रिंट पडदे, सोफा कव्हर, बेडशीट आणि फर्निचर कव्हर्सवर दिसत असल्याचेही आमिरने सांगितले. या पोस्टवर सोनम कपूरनेही प्रतिक्रिया दिली आहे.

स्प्लॅश प्रिंटवर आता यूरोपने ताबा मिळवला - फॅशन ब्लॉगर
आमिरने सोनम कपूरच्या ड्रेससह व्हिंटेज गाऊनचा फोटो शेअर केला आणि लिहिले – युरोपने या प्रिंटवर ताबा मिळवण्यापूर्वी, भारतात कॉटन फॅब्रिकमध्ये स्प्लॅश डिझाइनसाठी मोठी बाजारपेठ होती. युरोपियन लोकांनी त्यांच्या आवडीनुसार झाडे, वनस्पती आणि वेली यांची रचना देऊन या डिझाइनमध्ये बदल केले.

भारतात कापसाचे उत्पादन थांबले, युरोपात स्प्लॅश प्रिंटचे अनुकरण सुरू झाले
आमिरने पुढे लिहिले, 'गाऊनची प्रिंट भारत आणि ब्रिटनच्या समान इतिहासाचा पुरावा आहे. पण, 17 व्या शतकात युरोपियन व्यापाऱ्यांनी भारतीय कापसाच्या विरोधात मोहीम उघडली आणि भारतातच कापूस उत्पादन बंद झाले. खरे तर ब्रिटिशांनी भारतात कापूस उत्पादनावर बंदी घातली तेव्हा ही प्रिंट प्रचलित होती. या प्रिंटच्या कपड्यांचा पुरवठा बंद झाल्यामुळे, ही प्रिंट संपूर्ण ब्रिटन, नेदरलँड्स आणि फ्रान्समध्ये कॉपी केली गेली.'

त्यांनी पुढे सांगितले, 'यामुळे, नेदरलँड्स, ब्रिटन आणि फ्रान्समध्ये स्प्लॅश प्रिंट डिझाइनची कॉपी केली गेली. तर दुसरीकडे काही तज्ज्ञांच्या मते, लोक घरात काम करणाऱ्या महिलांना पडदे आणि चादर यांसारखे जुने कपडे देत असत. या महिला या कपड्यांपासून स्कर्ट-गाऊन आणि कपडे बनवत असत आणि अशा प्रकारे ही प्रिंट प्रचलित झाली.'

सोनम कपूरने फॅशन ब्लॉगरची पोस्ट तर शेअर केली आणि त्यावर प्रतिक्रियाही दिली. सोनमने लिहिले, 'अनामिकाने हा ड्रेस डिझाइन केला आहे. आमिर या ड्रेसचा अर्थ समजून घेतल्याबद्दल आणि सर्वांना समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद!'

सोनम या पिढीचा आवाज आहे: अनिल कपूर
सोनम कपूरचे वडील अनिल कपूर यांनी किंग चार्ल्स III च्या राज्याभिषेक समारंभातील तिच्या भाषणाचे कौतुक करणारी पोस्ट शेअर केली. सोनम कपूरने नमस्ते म्हणत आपल्या भाषणाची सुरुवात केली आणि कॉमनवेल्थ देशांचे महत्त्वही सांगितले. अनिल कपूर यांनी लिहिले, 'सोनम नेहमीच वेगळ्या पद्धतीने काम करते. सोनम ही या पिढीचा आवाज आणि ओळख आहे. मला सोनम कपूरचा पिता म्हणून अभिमान आहे,' असे अनिल म्हणाले.