आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हॅपी अ‍ॅनिव्हर्सरी:लग्नाच्या दुसर्‍या वाढदिवसानिमित्त सोनम कपूरने आनंदसाठी लिहिली इमोशनल नोट, चार वर्षांपूर्वी याच दिवशी झाली होती पहिली भेट 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लग्नानंतर सोनम लंडनमध्ये राहते, पण सध्या लॉकडाऊनमुळे ती दिल्लीतच थांबली आहे.

अभिनेत्री सोनम कपूर आणि आनंद आहूजा आज त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करत आहेत. 2018 मध्ये त्यांचे लग्न झाल्यापासून हे दोघेही त्यांच्या उत्तम केमिस्ट्रीसाठी सोशल मीडियावर  कायम चर्चेत असतात. या खास दिनाचे औचित्य साधत  सोनमने आनंदसाठी एक इमोशनल नोट लिहून त्यांच्या पहिल्या भेटीच्या काही सुंदर आठवणी शेअर केल्या आहेत.

सोनमने अलीकडेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर आनंदसोबत काढलेले पहिले छायाचित्र शेअर केले आहे, ज्यामध्ये ती त्याच्या गालावर चुंबन घेताना दिसत आहे. त्याचबरोबर आनंद छायाचित्रात आश्चर्यकारक एक्सप्रेशन्स देताना दिसतोय. या क्युट छायाचित्रासह सोनम लिहिते, 'आमचे एकत्र असलेले पहिले छायाचित्र. चार वर्षांपूर्वी, या दिवशी, मी एका शाकाहारी व्यक्तीला भेटले होते, तो  अतिशय कठीण योगा करतो आणि आरामात बिझनेस आणि रिटेलविषयी गप्पा मारतो. मला हे खूप मस्त आणि मादक वाटले होते.'

पुढे सोनमने लिहिले, 'चार वर्षे माझ्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल धन्यवाद. माझ्यासाठी ही सर्वात यशस्वी वर्षे होती. वाढदिवसाच्या लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा. मला आनंद आहे की मी तुला आयुष्यभर माझ्याबरोबर ठेवू शकते. मी तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम करते आणि मला माहित आहे की तूही करतोस. हे वचन माझ्यासाठी सर्वोत्कृष्ट भेट आहे.' 

आनंदने प्री अ‍ॅनिव्हर्सरी गिफ्ट दिले आहे

लग्नाच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी सोनम कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यात आनंदने तिला गिफ्ट म्हणून नाइनटेंडोचा व्हिडिओ गेम  दिल्याचे तिने सांगितले. ही भेट मिळाल्यानंतर सोनम एकदम उत्साही दिसत होती. आनंद तिला चांगल्या प्रकारे ओळखतो हेदेखील तिने सांगितले आहे. 

लग्नाला झाली 2 वर्षे 

सोनम आणि आनंद जवळजवळ दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर 2018 मध्ये लग्नबंधनात अडकले.  मुंबईतील झालेल्या त्यांच्या ग्रॅण्ड वेडिंगला बॉलिवूडचे  अनेक सेलेब्स उपस्थित होते. दोघांचे लग्न शीख रीतीरिवाजांनी झाले. लग्नानंतर सोनम लंडनमध्ये राहते, पण सध्या लॉकडाऊनमुळे ती दिल्लीतच थांबली आहे.

बातम्या आणखी आहेत...