आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेबी शॉवर:रॉयल अंदाजात झाला सोनमचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम, पार्टीमध्ये 'या' खास व्यक्तीने वेधून घेतले लक्ष

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोनमने पार्टीत केली भरपूर धमाल

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर लवकरच आई होणार आहे. नुकताच तिचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला. सोनमची धाकटी बहीण रियाने लंडनमध्ये ही खास पार्टी ठेवली होती. यावेळी सोनमच्या अनेक मैत्रिणी उपस्थित होत्या. सध्या या सोहळ्याचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. हे फोटो बघून ही पार्टी एका बागेत ठेवल्याचे दिसत आहे.

सोनमच्या बहिणीने शेअर केले इनसाइड फोटो
सोनमच्या डोहाळे जेवणात पाहुण्यांच्या आवडीनिवडीची विशेष काळजी घेण्यात आली होती. पार्टीतील टेबल फुलांनी सजवलेले होते आणि पाहुण्यांना दिलेल्या भेटवस्तूंसह सर्व गोष्टी अतिशय काळजीपूर्वक ठेवण्यात आल्या होत्या. त्याच वेळी, रियाने एका नोटचा फोटो देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये पाहुण्यांच्या नावांसह प्रत्येक तपशील शेअर केला आहे. हे फोटो शेअर करत रियाने लिहिले, 'किती सुंदर बेबी शॉवर'.

गायकाने वेधून घेतले लक्ष

या पार्टीत सोनम कपूर खूप एन्जॉय करताना दिसली. यावेळी ती पिंक कलरच्या ड्रेसमध्ये दिसली. फोटोत सोनमसोबत दिसणारी ही व्यक्ती कोण? हाच प्रश्न अनेकाना पडला होता. सोनमच्या लंडनच्या घरी पार पडलेल्या या सोहळ्यातील चर्चेत आलेली व्यक्ती म्हणजे म्युझिशियन लिओ कल्याण. या कार्यक्रमामध्ये त्याने सोनमचे सुपरहिट गाणे ‘मसककली मसककली’ गायले. हे गाणे सोनमने या पार्टीदरम्यान खूप एन्जॉय केले. या गाण्यादरम्यानचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यासोबत लिओने सोनम कपूरसोबत अनेक फोटोही क्लिक केले.

लूकमुळे ट्रोल झाला कल्याण

लिओने पार्टीचे काही फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. लिओ कल्याणला त्याच्या लूकमुळे सोशल मीडियावर मात्र प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. या पोस्टवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘सोबत असलेला बेबी आहे की बाबा.’ दुसरा नेटकरी म्हणाला, ‘कल्याणच झाले याचे.’ आणखी एक नेटकरी म्हणाला, ‘दादा हा सोबत कोण आहे?’, अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी लियो कल्याणला ट्रोल केले आहे.

सोनमने काही महिन्यांपूर्वी प्रेग्नेंसीची बातमी केली जाहीर
सोनम आणि आनंदने काही महिन्यांपूर्वी प्रेग्नेंसीची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. फोटो शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, "चार हात, आमच्याकडून जितके होईल तितकी सोय केली जाईल. तुझ्यासोबत दोन ह्रदय धडकतील. एक कुटुंब असे आहे जे तुला नेहमी पाठिंबा देईल. मी तुझी वाट पाहत आहे," अशा शब्दांत सोनमने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

2018 मध्ये झाले होते सोनमचे लग्न
सोनमबद्दल सांगायचे तर तिने 2018 मध्ये बिझनेसमन आनंद आहुजासोबत लग्न केले होते. लग्नानंतर सोनम चित्रपटांपासून दूर कौटुंबिक जीवनाचा आनंद घेत आहे. ती शेवटची 'सोनम द झोया फॅक्टर' या चित्रपटात दिसली होती.

बातम्या आणखी आहेत...