आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळाला सोडून रेड सी फिल्म फेस्टिवलमध्ये पोहचली सोनम:म्हणाली - खूप नर्व्हस आहे, तो माझ्या आई आणि बहिणीजवळ

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने काही दिवसांपूर्वी एका गोंडस लेकाला जन्म दिला आहे. सोनम आणि पती आनंद अहुजा यांनी मुलाचं नाव वायू ठेवलं आहे. सोनमने ‘रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये सहभाग घेतला. आई झाल्यानंतर सोनम पहिल्यांदाच आपल्या बाळाला सोडून बाहेर पडली. यात एक व्हिडिओ तिने शेअर केला आहे. ती म्हणाली की, मी वायूला खूप मीस करत आहे. त्याला पहिल्यांदा सोडून बाहेर आली आहे. एक दिवसासाठी का होईना पण त्याला सोडल्यामुळे थोडी घाबरले आहे. तो माझ्या आई आणि बहिणीजवळ आहे. यामुळे मला जास्त ताण वाटत नाही आहे. मी 20 तासांसाठी जात आहे. लवकर घरी परतण्यासाठी मी एक मार्ग शोधला आहे.

बातम्या आणखी आहेत...