आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेबी शॉवर सेरेमनी:अंतरा मोतीवाला मारवाहाच्या डोहाळे जेवणाला पती करण बुलानीसोबत पोहोचली रिया कपूर, सोनम, अर्जुन, खुशी आणि शनाया यांचीही हजेरी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अंतराच्या बेबी शॉवरची काही छायाचित्रे आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूरची मुलगी आणि सोनम कपूरची बहीण रिया कपूरने बॉयफ्रेंड करण बुलानीसोबत 14 ऑगस्ट रोजी लग्न केले. आता अलीकडेच या नवविवाहित जोडप्याने संपूर्ण कपूर कुटुंबासह एका कार्यक्रमात हजेरी लावली. सोनम आणि रिया कपूरचा आते भाऊ मोहित मारवाह आणि त्याची पत्नी अंतरा मोतीवाला मारवाह लवकरच आईबाबा होणार आहेत. यानिमित्ताने बुधवारी अंतरा मारवाहच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाला रिया आणि तिचा पती करण, सोनम, अर्जुन आणि संपूर्ण कपूर कुटुंबीय पोहोचले होते.

अंतराच्या बेबी शॉवरची काही छायाचित्रे आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नवविवाहित जोडपं रिया-करण, सोनम, खुशी, अर्जुन, अंशुला आणि शनाया कपूर हे मोहित आणि अंतरासोबत या व्हायरल फोटोंमध्ये दिसत आहेत. सगळे पारंपरिक लूकमध्ये दिसत आहेत. अंतरा मोतीवाला ही टीना अंबानीची भाची आहे. अंतराने फेब्रुवारी 2018 मध्ये यूएईमध्ये मोहित मारवाहशी लग्न केले होते. मोहित मारवाह हा सोनम आणि अर्जुनच्या आत्याचा मुलगा आहे.

सोनम कपूरने शेअर केले बेबी शॉवरचे फोटो
सोनम कपूरने अंतराच्या बेबी शॉवरचे काही फोटो तिच्या सोशल मीडियावर अकाउंटवर शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये तिने लिहिले, "खानदान फॉर द गोदभराई ऑफ अंतरा." यासोबतच सोनमने जे या कार्यक्रमात हजर राहू शकले नाहीत त्या सगळ्यांना फोटोमध्ये टॅग केले आहे. जान्हवी, अहान, हर्षवर्धन हे या कार्यक्रमाला अनुपस्थित होते.

सोनम कपूर व्यतिरिक्त, खुशी, शनाया आणि अर्जुनने देखील अंतरा मोतीवालाच्या बेबी शॉवरचे सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. चाहत्यांनी या फोटोवर लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

बातम्या आणखी आहेत...