आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घराणेशाहीवरुन वाद:आलियावर टीका करणार्‍यांना आई सोनी राजदानचे उत्तर, म्हणाल्या - 'तुमच्या मुलांना इंडस्ट्रीत यायचे असेल तर येऊ देणार नाही का?'

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आता सोनी राजदान यांनी आपले मत मांडले आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतरव बॉलिवूड घराणेशाहीवरुन वाद पेटला आहे. यामुळे आलिया भट्ट, सोनम कपूर, जान्हवी कपूर यांच्यासारख्या अनेक स्टारकिड्सना टीकेचा सामना करावा लागत आहे. हे प्रकरण सातत्याने वाढ असल्याचे पाहून महेश भट्ट यांच्या पत्नी आणि आलिया भट्टची आई सोनी राजदान यांनी आपले मत मांडले आहे. 

‘अलीगड’ आणि ‘सिटीलाइट’ या चित्रपटांचे दिग्दर्शक हंसल मेहता यांनी काही दिवसापूर्वी सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी एक ट्विट केले होते. यात त्यांनी कलाविश्वात घराणेशाही आहे असे म्हटले होते. त्यांच्या या ट्विटला सोनी राजदान यांनी उत्तर देताना लिहिले,  'तुम्ही कोणाचा मुलगा किंवा मुलगी आहात, हे समजल्यानंतर त्यांच्याकडून लोकांच्या अपेक्षा वाढतात. आणि जे लोक आज घराणेशाहीच्या मद्द्यावरुन चर्चा करत आहेत, जर त्यांच्या मुलांची खरंच कलाविश्वात येण्याची  इच्छा असेल तर काय? ते आपल्या मुलांना विरोध करु शकतील?', अशा आशयाचे ट्विट सोनी यांनी केले आहे.  

घराणेशाहीविषयी बोलताना हंसल मेहता म्हणाले होते, 'घराणेशाहीवरुन सुरु असलेला वाद अजून व्यापक व्हावा. कलाविश्वात कायम मेरीट पाहिले जाते. मी या क्षेत्रात होतो, म्हणून माझ्या मुलाला येथे संधी देण्यात आली आणि तो आता त्याच्या कर्तृत्वार येथे स्थान भक्कम करुन आहे', असे ट्विट त्यांनी केले होते.

बातम्या आणखी आहेत...