आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोलकाता येथे एका कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करण्यासाठी आलेल्या केके यांचा कार्यक्रमानंतर मृत्यू झाला. आता सोनू निगम त्याच कोलकात्यात लाईव्ह परफॉर्म करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयोजकांची सोनूशी बोलणी झाली असून तो जुलैमध्ये परफॉर्म करू शकतो. मात्र, सोनूच्या बाजूने अद्याप कोणतेही वक्तव्य आलेले नाही.
केके यांचा लाइव्ह कॉन्सर्च कोलकात्याच्या नजरुल मंच येथे झाला होता ज्याची आसनक्षमता 2700 आहे. पण त्यांच्या कार्यक्रमाला सुमारे 7 हजार लोक पोहोचले होते, त्यामुळे स्टेजचा एसीही नीट चालत नव्हता. तेव्हापासून या कार्यक्रमातील गैरव्यवस्थापन चर्चेत आहे. केके यांच्या मृत्यूनंतर गर्दीच्या ठिकाणी सेलिब्रिटींचे लाईव्ह परफॉर्मन्स देण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव कलाकार कोलकात्यात लाईव्ह शो करणे टाळत असल्याचेही सांगण्यात येत आहे.
याचे उत्तर सोनूच्या इव्हेंटमधून मिळेल कार्यक्रमाचे आयोजक तोचन घोष म्हणाले, “आम्ही सोनू यांच्याळी बोलणी करत आहोत आणि ते परफॉर्म करण्यास तयार आहेत. जर सर्व काही योजनेनुसार झाले तर जुलैमध्ये ते कोलकाता येथे लाइव्ह कॉन्सर्ट करतील. कोलकाता शहर सुरक्षित नाही, अशा अफवा जे लोक पसरवत आहेत, त्यांना सोनूच्या लाइव्ह परफॉर्मन्समधून उत्तर मिळेल."
सर्वात मोठे प्राधान्य गायकाच्या सुरक्षेला - तोचन घोष
घोष यांनी लाइव्ह शो दरम्यान यापूर्वी घडलेल्या अनेक घटनांचा संदर्भ दिला आणि ते म्हणाले, "कलाकारांसाठी कोलकाता पूर्णपणे सुरक्षित आहे. कन्नड सिंगर वॉरियर आणि मिका सिंगच्या चंदिगडमधील शोमध्येही गडबड झाली होती. मोठ्या कार्यक्रमांना गर्दी असते. पण गायकांच्या सुरक्षेला आमचे सर्वात मोठे प्राधान्य आहे."
लाइव्ह कॉन्सर्टनंतर झाले होते केके यांचे निधन
बॉलिवूडचे दिग्गज गायक कृष्णकुमार कुन्नथ उर्फ केके यांचे 31 मे रोजी कोलकाता येथे लाइव्ह कॉन्सर्टनंतर वयाच्या 53 व्या वर्षी निधन झाले. परफॉर्मन्सनंतर ते हॉटेलमध्ये पोहोचले आणि तिथे त्यांची प्रकृती खालावली, त्यानंतर त्यांना सीएमआरआय (कोलकाता वैद्यकीय संशोधन संस्था) रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.