आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वादग्रस्त वक्तव्य:मुलगा निवानला गायक बनवू इच्छित नाही सोनू निगम, म्हणाला -  ‘माझ्या मुलाने भारतात काम करु नये अशी माझी इच्छा आहे’

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • निवान यूएईच्या टॉप गेमर्सपैकी एक आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक सोनू निगमने अलीकडेच एका मुलाखतीत आपल्या मुलाच्या करिअरसंदर्भात एक खळबळजनक वक्तव्य केले आहे. माझ्या मुलाला मी गायक बनवू इच्छित नाही. शिवाय त्याने भारतात काम करु नये अशी माझी इच्छा आहे, असे सोनू म्हणाला आहे. सोनू निगमचा मुलगा निवान हा सध्या दुबईत असून गेमिंगमध्ये त्याला रुची आहे. इतकेच नाही तर तो यूएईच्या टॉप गेमर्सपैकी एक आहे.

निवानला गेमिंग करायला आवडते

47 वर्षीय सोनू निगमने टाइम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केला. तो म्हणाला- ''खरे सांगायचे तर मला त्याला गायक बनवायचे नाही. तो भारतात राहणार नाही तो सध्या दुबईमध्ये आहे. त्याने तिथेच करिअर करावे असे मला वाटते. तो जन्मजात गायक आहे, असे मला वाटते. त्याला संगीताची आवड असून तो देखील खूप छान गातो. पण त्याला गाण्यापेक्षा अधिक गेमिंग करायला आवडते. मला वाटते त्याने आपले करिअर निवडले आहे. तो यूएईच्या टॉप मोस्ट गेमर्सपैकी एक आहे'', असे सोनूने सांगितले.

आय फॉर इंडियामध्ये गाताना दिसला होता निवान
लहान असताना निवान अनेक वेळा सोनूबरोबर स्टेजवर गाताना दिसला. निवान आपल्या वडिलांसोबत रेकॉर्डिंग स्टुडिओमध्येही दिसला होता. लॉकडाऊनच्या काळात निवान सोनूसोबत ऑनलाइन कॉन्सर्टमध्येही सहभागी झाला होता. सोनूबद्दल सांगायचे म्हणजे त्याचा एक नवा म्यूझिक अल्बम लवकरच रसिकांच्या भेटीस येत आहे. या आगामी अल्बममधील ‘ईश्वर का वो सच्चा बंदा’ या हे गाणे अलीकडेच प्रदर्शित झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...