आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मजेशीर:मास्क लावून मॉलमध्ये गेलेल्या सोनू निगमला कुणीही ओळखू शकले नाही,  व्हिडीओ शेअर करुन सोनू म्हणाला - हा तर बोनस

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊनमुळे सोनू निगम सध्या दुबईत आहे.

गायक सोनू निगमने अलीकडेच आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो दुबईच्या मॉलमध्ये मास्क घालून फिरताना दिसत आहे. विशेष म्हणजे इथे त्याला कोणीही ओळखू शकले नाही. हे सांगताना सोनूने लिहेल, 'आजचा बोनस -कुणीही ओळखलं नाही.' 

शेअर केलेल्या व्हिडीओत सोनू म्हणतोय, "जगाला काय झाले आहे आणि हे चांगले झाले की, कुणीही ओळखले नाही."  हे ऐकून त्याचा मुलगा निवान हसायला लागतो. यानंतर सोनू म्हणतो, 'हे चांगलं आहे, हा मॉल ऑफ इमिरेट्स आहे.' 

  • लॉकडाऊनमुळे सोनू दुबईत आहे

सोनू निगम सध्या दुबईत अडकला आहे. लॉकडाऊनमुळे तो परत येऊ शकला नाही. त्यानंतर तो तिथून त्याेचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत आणि फॅन्सना अपडेट आणि एंटरटेन करत आहेत. सोनू ज्या 'मॉल ऑफ एमिरेट्स'मध्ये गेला होता तो दुबईतील सर्वात प्रसिद्ध मॉलपैकी एक आहे.

  • फादर्स डेच्या निमित्ताने वडिलांची रेकॉर्डिंग शेअर केली होती रविवारी फादर्स डेच्या निमित्ताने सोनूने त्याचे वडील आगम कुमार यांचा एक व्हिडीओ शेअर केला होता. सोबतच लिहिले होते की, 'माझे वडील आगम कुमार निगम यांचा 1983 मधील टायटॅनिक लूक... मी या रेकॉर्डिंगसह आणखी काही गोष्टी जतन केल्या आहेत.'
0