आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Entertainment
 • Bollywood
 • Sonu Nigam Journey In Bollywood Gulshan Kumar Gave Him First Break In Films, Now Sonu Calls Out Bhushan Kumar Says ‘Tune Galat Admi Se Panga Le Liya’

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विवाद:गुलशन कुमार यांनी दिली होती सोनू निगमला चित्रपटात गाण्याची संधी, आता त्यांच्याच मुलाविरोधात या गायकाने उघडला मोर्चा 

मुंबईएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • 1995 पर्यंत सोनूने पार्श्वगायक म्हणून इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली होती.

सोमवारी गायक सोनू निगमने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करताना संगीत उद्योगातील किंग भूषण कुमार यांना थेट आव्हान दिले आहे. भूषण यांना म्युझिक माफिया म्हणत तू चूकीच्या व्यक्तीशी पंगा घेतल्याचे सोनूने म्हटले आहे.  “भूषण कुमार, आता तर मला तुझं नाव घ्यावंच लागेल. तू चुकीच्या माणसाशी पंगा घेतलास. जेव्हा तू माझ्या घरी येऊन मला विनंती करायचास, ती वेळ विसरलास तू. भावा माझा म्युझिक अल्बम कर, स्मिता ठाकरे यांच्याशी माझी भेट करून दे, बाळासाहेब ठाकरे, सहारा श्री यांच्याशी भेट करून दे. अबू सालेमपासून मला वाचव. अशी विनवणी तू माझ्याकडे केली होती. विसरलास का ते दिवस? आता तू माझ्या नादी लागू नकोस', असा इशारा सोनूने भूषण कुमार यांना दिला आहे.  

भूषण कुमार हे टी-सीरिजचे मालक असून गुलशन कुमार हे त्यांचे वडील होते. गुलशन कुमार यांनीच सोनू निगमला इंडस्ट्रीत पहिल्यांदा गाण्याची संधी दिली होती. 

सोनू निगमचा जन्म  हरियाणाच्या फरीदाबाद शहरात 30 जुलै 1973 रोजी आगम निगम आणि शोभा निगम यांच्या घरी झाला. त्याचे वडील प्रसिद्ध गायक होते आणि स्टेज परफॉर्म करायचे. सोनूला संगीताचे धडे वडिलांकडूनच मिळाले. वयाच्या चौथ्या वर्षापासून तो वडिलांसोबत स्टेजवर गाऊ लागला होता.

 • बालपणी वडिलांसोबत गाणी गायली 

एकदा एका स्टेज शो दरम्यान सोनूने वडील अगाम निगम यांच्यासमवेत मोहम्मद रफी यांचे 'क्या हुआ तेरा वादा' हे गाणे गायले जे लोकांना खूप आवडले. यानंतर त्याचे वडील त्याला लग्नात आणि पार्टीमध्ये सोबत घेऊन जायचे. येथूनच सोनूची गायनाची यात्रा सुरू झाली.

 • वयाच्या 19 व्या वर्षी मुंबईत आला

स्टेज शो दरम्यान सोनू मोहम्मद रफी यांची गाणी गात असे. यासह, तो हिंदुस्थानी शास्त्रीय गायक उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्याकडून गायनाचे धडे घेत होता. प्लेबॅक गायक होण्यासाठी सोनू वयाच्या 19 व्या वर्षी मुंबईत दाखल झाला. त्याला इथे खूप संघर्ष करावा लागला.

वडिलांसोबत स्टेजवर परफॉर्म करताना सोनू निगम
वडिलांसोबत स्टेजवर परफॉर्म करताना सोनू निगम
 • टी-सीरिजला दिसली सोनूची प्रतिभा 

त्या दिवसांत टी-सीरिज नवीन गायकांना गाण्याची संधी देत ​​होती, यावेळी कंपनीची नजर सोनूवर पडली. मोहम्मद रफीच्या गाण्यांवर सोनूचा आवाज खूप चांगला वाटत होता, ज्यामुळे कंपनीने सोनूच्या आवाजात 'रफी की यादें' हा अल्बम लाँच केला.

 • गुलशन कुमार यांनी चित्रपटांमध्ये दिली संधी 

सोनूला टी सीरिजचे मालक गुलशन कुमार यांनी चित्रपटात गाण्याची संधी दिली होती. 'जानम' (1990) चित्रपटासाठी त्याच्याकडून गाणे गाऊन घेतले. परंतु चित्रपट प्रदर्शित झाला नाही. यानंतर, त्याला पुन्हा एकदा टी-सीरिजने संधी दिली. 'आजा मेरी जान' (1992) या चित्रपटातील 'ओ आसमान वाले' हे गाणे त्याने गायले. हे त्याचे पहिले रिलीज झालेले गाणे ठरले.

 • गुलशन यांनीच दिले टर्निंग पॉईंट ठरलेले गाणे 

1995 पर्यंत सोनूने पार्श्वगायक म्हणून इंडस्ट्रीत एक वेगळी ओळख निर्माण केली होती. यावर्षी त्याला छोट्या पडद्यावर 'सारेगामा' हा सिंगिंग रिअॅलिटी शो होस्ट करण्याची संधी मिळाली. यानंतर गुलशन कुमार यांनी त्यांच्या 'बेवफा सनम' चित्रपटात 'अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का'  हे गाणे गाण्याची संधी सोनूला दिली. हे गाणे सोनूच्या कारकीर्दीचा महत्त्वपूर्ण टप्पा ठरला. हे गाणे जबरदस्त हिट ठरले होते.

 • 'बॉर्डर'च्या गाण्यांनी नशीब बदलले

सोनूला सर्वात मोठे यश 1997 मध्ये आलेल्या 'बॉर्डर' चित्रपटातील 'संदेश आते है' या गाण्याने मिळाली, हे गाणे  अनू मलिक यांनी संगीतबद्ध केले होते. यानंतर, त्याने मागे वळून पाहिले नाही. चित्रपटांमध्ये गाण्याव्यतिरिक्त त्याने 'दिवाना' (1999), 'याद' (2001), 'जान' (2000) आणि 'चंदा की डोली' (2005) सारखे अनेक उत्कृष्ट अल्बम देखील केले. हिंदीशिवाय सोनूने उर्दू, तामिळ, बांगला, पंजाबी, मराठी, तेलगू, भोजपुरी, कन्नड आणि उडिया भाषांमध्येही गाणी गायली आहेत.

 • अभिनयात सोनूने आपला हात आजमावला 

गायनाशिवाय सोनू निगमने अभिनयातही हात आजमावला आहे. त्याने 'जानी दुश्मन', 'लव्ह इन नेपाल' आणि 'काश आप हमारे होते' या चित्रपटांत काम केले आहे. सोनूने फेब्रुवारी 2002 मध्ये मधुरिमा मिश्राशी लग्न केले. या जोडप्याला निवान नावाचा एक मुलगा देखील आहे.

सोनू निगमचा तो व्हिडीओ ज्यातून त्याने भूषण कुमार यांच्यावर निशाणा साधला... 

बातम्या आणखी आहेत...