आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

रोखठोक मत:सुशांतच्या मृत्यूनंतर सोनू निगमचा इशारा - 'म्युझिक इंडस्ट्रीवर दोन कंपन्यांचे राज्य, लवकरच येथूनही आत्महत्येच्या बातम्या येऊ शकतात'

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रसिद्ध गायक सोनू निगमने म्युझिक इंडस्ट्रीतील कटू सत्य कथन केले आहे.
Advertisement
Advertisement

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. सुशांतने आत्महत्या का केली याबद्दल बरेच तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. बॉलिवूडमधील घराणेशाही आणि कंपुशाहीला यासाठी जबाबदार ठरवले जात आहे.

सुशांतला सात चित्रपटांमधून काढून टाकण्यात आले आणि नंतर या चित्रपटांमध्ये इतर अभिनेत्यांना कास्ट करण्यात आले, त्यामुळे सुशांत नैराश्येत गेला आणि त्यातूनच त्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले अशी चर्चा सुरु आहे. पण सत्य नेमके काय आहे, याचा तपास पोलिस करत आहेत. आता यातच प्रसिद्ध गायक सोनू निगमने संगीत जगतातील कटू सत्यावरुन पडदा उचलला असून म्युझिक इंडस्ट्रीतूनही आत्महत्येच्या बातम्या येऊ शकता, असा इशारा दिला आहे.

View this post on Instagram

You might soon hear about Suicides in the Music Industry.

A post shared by Sonu Nigam (@sonunigamofficial) on Jun 18, 2020 at 4:18am PDT

सोनू म्हणाला, 'चित्रपटांपेक्षा सर्वात मोठा माफिया म्युझिक इंडस्ट्रीत आहे'

सोनूने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन साडेसात मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला आहे. तो म्हणतोय, गुड मॉर्निंग, नमस्ते. मी ब-याच काळापासून व्हीलॉग केले नाही. वास्तविक मी मूड मध्ये नव्हतो. भारत अनेक दबावांमधून जात आहे. सुशांत सिंह राजपूत गेल्यानंतर भाविनक आणि मानसिक प्रेशर आले. दुःख होणे स्वाभाविक आहे, कारण आपल्या डोळ्यासमोर तरुण जीवांचा अंत पाहणे सोपे नाही. एखादी निष्ठूर व्यक्तीच असेल, ज्याला यामुळे काही फरक पडत नसेल.  

सोनू पुढे म्हणाले, 'मला या व्हिडीओद्वारे म्युझिक इंडस्ट्रीला एक निवेदन करण्याची इच्छा आहे, कारण आज सुशांत सिंह राजपूतचा आपल्यातून गेला. एका अभिनेत्याचा अंत झाला. उद्या तुम्ही एखाद्या गायक, गीतकार किंवा संगीतकारांबद्दल असे ऐकू शकता. कारण आपल्या देशातील म्युझिक इंडस्ट्रीतील जे वातावरण आहे, दुर्दैवाने चित्रपटसृष्टीपेक्षा मोठे माफिया संगीत उद्योगात आहेत. मी समजू शकतो की लोकांसाठी व्यवसाय करणे आवश्यक आहे. प्रत्येकाला वाटते की त्यांनी इंडस्ट्रीवर राज्य केले पाहिजे. मी नशीबवान होतो, की कमी वयातच या इंडस्ट्रीत आलो आणि यांच्या तावडीतून सुटलो. पण आज जी नवीन मुलं इथे येत आहेत, त्यांच्यासाठी हा मार्ग सोपा नाहीये,' असा खुलासा सोनूने केला आहे. 

म्युझिक इंडस्ट्रीवर दोन कंपन्यांचे वर्चस्व : सोनूने म्युझिक इंडस्ट्रीवर दोन मोठ्या कंपन्या वर्चस्व गाजवत असल्याचे म्हटले आहे. पण त्याने या दोन्ही कंपन्यांच्या नावाचा उल्लेख टाळला आहे. तो म्हणाला, 'अनेक मुलंमुली माझ्याशी या विषयावर बोलले आहेत. त्यांना भविष्याची चिंता आहे. निर्मात्यांना, दिग्दर्शकांना, संगीतकारांना काम करायचे आहे, पण म्युझिक कंपनी हा आमचा कलाकार नाही, असे सांगते. मला ठाऊक आहे, तुम्ही मोठे लोक आहात. म्युझिक इंडस्ट्रीवर तुमचा दबदबा आहे. दोन लोकांच्या हातातली ही शक्ती आहे, फक्त दोन लोक... ते ठरवतात की कोण गाणं गाणार आणि कोण नाही', असे सोनू म्हणाला आहे. 

सोनू आपले बोलणे पुढे चालू ठेवत म्हणाला, 'मी या सर्वांमधून गेलो आहे, मी माझ्या जगात खूप आनंदी आहे. पण नवीन गायक, नवीन संगीतकार, नवीन गीतकारांना पाहिले आहे, ते कधी कधी उघडपणे रडतात. जर उद्या त्यांचा मृत्यू झाला तर तुमच्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होतील.'

इतकेच नाही तर मी गायलेली गाणी डब करण्यात आली. विचार करा, माझ्यासोबत असे घडू शकते तर मग नवोदितांसोबत काय होऊ शकतं, असेही सोनू म्हणाला आहे.     

Advertisement
0