आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाद:सोनू निगमचा टी-सीरिजचे मालक भूषण कुमारला इशारा, म्हणाला - 'माझ्याशी पंगा घेतलास तर मरीना कुंवरचा व्हिडीओ यूट्युबवर टाकेन' 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर सोनू निगमने म्युझिक इंडस्ट्रीतील माफियांचा खुलासा केला होता.
  • सोनूने अरमान मलिकचे दीड वर्षांपूर्वीचे ट्विट दाखवले, ज्यात म्युझिक इंडस्ट्रीतील गँगचा उल्लेख होता.

म्युझिक इंडस्ट्रीतील माफियांविषयीचा व्हिडीओ प्रसिद्ध केल्यानंतर गायक सोनू निगमने टी-सीरिजचे मालक भूषण कुमारला इशारा दिला आहे. सोनूने 22 जून रोजी इंस्टाग्रामवर आणखी एक व्हिडीओ शेअर करुन भूषण कुमारला एक्सपोज करण्याविषयी म्हटले आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना सोनूने कॅप्शनमध्ये लिहिले, 'लातों के माफिया बातों से नहीं मानते.'

  • सोनूने असा व्यक्त केला राग

व्हिडीओत सोनू म्हणतोय, “भूषण कुमार, आता तर मला तुझं नाव घ्यावंच लागेल. तू चुकीच्या माणसाशी पंगा घेतलास. जेव्हा तू माझ्या घरी येऊन मला विनंती करायचास, ती वेळ विसरलास तू. भावा माझा म्युझिक अल्बम कर, स्मिता ठाकरे यांच्याशी माझी भेट करून दे, बाळासाहेब ठाकरे, सहारा श्री यांच्याशी भेट करून दे. अबू सालेमपासून मला वाचव. अशी विनवणी तू माझ्याकडे केली होती. विसरलास का ते दिवस? आता तू माझ्या नादी लागू नकोस.' सोनूने व्हिडीओत मरीना कुंवरचे नाव घेतले आहे. तो म्हणतो, 'मरीना कुंवर लक्षात आहे ना? ती का बोलली आणि नंतर तिने माघार का घेतली हे मला नाही माहित. हे माध्यमांना माहित आहे. तिचा व्हिडीओ माझ्याकडे आहे. जर तू माझ्याशी पंगा घेतलास तर तो व्हिडीओ मी माझ्या युट्यूब चॅनलवर पोस्ट करेन', अशा इशारा सोनूने भूषण कुमारला दिला आहे. 

सोनू म्हणतो, 'मी खूप चांगल्या पद्धतीने बोललो होतो, की तुम्ही नवीन कलाकारांसोबत प्रेमाने वागा. कारण आत्महत्या  झाल्यानंतर विचार करण्यापेक्षा त्यापूर्वी वातावरण बदललेले कधीही चांगले. पण जे माफिया आहेत ते त्याच पद्धतीने वागणार. मी कोणाचेच नाव घेतले नव्हते. पण त्यांनी माझ्या विरोधात बोलण्यासाठी पाच-सहा जणांच्या मुलाखती घेतल्या. याच पाच-सहा जणांपैकी एकाच्या भावाने दीड वर्षापूर्वी एक ट्विट केले होते. जर संगीत क्षेत्रात एकता असती तर चित्रच वेगळे असते असे त्याने या ट्विटमध्ये लिहिले होते.'

  • मरीना - जिने Me Too प्रकरणात भूषण कुमारचे नाव घेतले होते 

व्हिडीओमध्ये सोनू मरीना कुंवरचे नाव घेत आहे. ती एक मॉडेल आणि टीव्ही अभिनेत्री आहे. 2018 मध्ये बॉलिवूडमध्ये सुरु झालेल्या मीटू मोहिमेदरम्यान मरीना चर्चेत आली होती. मरीनाने  भूषण कुमारवर शोषण केल्याचा आरोप केला होता. आज तक वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मरीना म्हणाली होती की, भूषण कुमारने व्हिडीओमध्ये काम देण्याच्या नावाखाली तिला घरी बोलावले होते  आणि चुकीचे वागण्याचा प्रयत्न केला होता.

बातम्या आणखी आहेत...