आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेने कान टोचल्यानंतर सोनू सूदचा माफीनामा:गरिबांबद्दल खूप काही सांगून गेला अभिनेता, ट्वीट चर्चेत

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदचा धावत्या ट्रेनच्या दारात बसलेला व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्याचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर त्याला प्रचंड ट्रोल केले गेले. इतकेच नव्हे तर अनेकांनी सोनू सूदवर कारवाईची मागणी केली होती. लोकांच्या मागणीनंतर 3 जानेवारी रोजी रेल्वेने सोनूची चांगलीच कानउघडणी केली. धावत्या रेल्वेच्या दारात बसून प्रवास करणे धोकादायक ठरू शकते. कृपया असे करू नका कारण यामुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश जाईल, असे रेल्वे प्रशासनाने त्याला म्हटले. रेल्वेने कान टोचल्यानंतर सोनूने आता माफी मागितली आहे. त्याने ट्वीट करत सर्वप्रथम मी क्षमा मागतो, असे म्हटले आहे.

रेल्वेच्या ट्वीटला उत्तर देत सोनू म्हणाला, "सर्वप्रथम मी क्षमा मागतो. लाखो गरीब लोकांचे आयुष्य अजूनही या ट्रेनच्या दरवाज्यात बसूनच निघून जाते, तेव्हा त्यांना कसे वाटत असेल याचाच अनुभव घेण्यासाठी मी बसलो होतो. हा मेसेज देण्यासाठी आणि देशाच्या सोयी सुविधा आणखी उत्तम बनवण्यासाठी तुमचे मनापासून आभार," असे सोनूने म्हटले आहे. सोनूच्या या ट्वीटची जबरदस्त चर्चा होत आहे.

काय म्हणाले होते रेल्वे प्रशासन?

रेल्वेने 3 जानेवारी रोजी सोनू सूदने शेअर केलेला व्हिडिओ रिट्वीट केला होता आणि म्हटले होते, "सोनू सूद, तुम्ही देश आणि जगातील लाखो लोकांसाठी आदर्श आहात. ट्रेनमध्ये असा प्रवास करणे धोकादायक आहे, अशा प्रकारच्या व्हिडिओमुळे तुमच्या चाहत्यांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो. कृपया असे करू नका. सुरळीत आणि सुरक्षित प्रवासाचा आनंद घ्या," असे रेल्वेने प्रशासनाने म्हटले.

सोनू सूदने 13 डिसेंबर रोजी ट्विटर आणि फेसबुकवर एक 22 सेकंदाची क्लिप शेअर केली होती. यामध्ये सोनू सूद हा एका धावत्या ट्रेनच्या दाराशी बसेलला दिसून येत आहे. यावेळी ट्रेनचा वेगही जास्त असून सोनू ट्रेनच्या बाहेर लटकताना पाहायला मिळत आहे. याच्या बॅकग्राऊंडला 'मुसाफिर हूं यारों' हे प्रसिद्ध बॉलिवूड गाणे वाजत ऐकू येते. पण सोनूचा हा स्टंट लोकांना आवडला नाही. अनेकांनी सोनूवर टीका करुन त्याच्यावर कारवाई केली जावी अशी मागणी केली होती.

  • सोनू सूद धावत्या ट्रेनच्या दारात बसला:रेल्वे प्रशासनाने केली कानउघडणी, म्हटले - तुम्ही लाखो लोकांचा आदर्श आहात, असे करू नका

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदचा धावत्या ट्रेनच्या दारात बसलेला व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्याचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर त्याला प्रचंड ट्रोल केले गेले. इतकेच नव्हे तर अनेकांनी सोनू सूदवर कारवाईची मागणी केली होती. आता रेल्वेने सोनूची कानउघडणी केली आहे. धावत्या रेल्वेच्या दारात बसून प्रवास करणे धोकादायक ठरू शकते. कृपया असे करू नका कारण यामुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश जाईल, असे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे. वाचा सविस्तर...

बातम्या आणखी आहेत...