आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भास्कर एक्सक्लुझिव्ह:सोनू सूदच्या निकटवर्तीयांचा दावा; भाजपने पद्मश्री देण्याचा प्रस्ताव ठेवला होता, पण सोनूने प्रतिसाद दिला नाही, छाप्याबाबत सोनू शनिवारी निवेदन जारी करू शकतो

अमित कर्णएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आयकर विभागाची कारवाई शुक्रवारी पूर्ण होईल.

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या घर आणि कार्यालयावर आयकर विभागाची कारवाई तिस-या दिवशीही सुरु आहे. दरम्यान, सोनूच्या निकटवर्तीयांनी दैनिक भास्करला सांगितले की, भाजपने सोनूला पद्मश्री देण्याचा प्रस्ताव ठेवला होता, पण त्यावर सोनूने कोणताही प्रतिसाद दिला नाही. इतकेच नाही तर त्याच्या मित्रांनी त्या अफवांचेदेखील खंडन केले, ज्यात सोनूच्या स्वयंसेवी संस्थेमध्ये बेकायदेशीर पैसा असल्याची चर्चा सुरु होती.

निकटवर्तीयांच्या मते, आयकर विभागाची कारवाई शुक्रवारी पूर्ण होईल. त्यानंतर सोनू अधिकृत निवेदन जारी करेल. सोनूच्या निकटवर्तीयाने सोनूवर लावण्यात आलेल्या आरोपांवर उत्तरे दिली आहेत. संभाषणाचा प्रमुख अंश:-

प्रश्न: आयटी अधिकाऱ्यांनी शुक्रवारीही सोनूच्या घरी कारवाई केली का?

उत्तर: होय. त्यांची कारवाई शुक्रवारी पूर्ण होणार आहे. तीन दिवसांच्या कारवाईत त्यांना घरातून काहीही मिळाले नाही.

प्रश्न: स्वयंसेवी संस्था किंवा फाउंडेशनमध्ये बेकायदेशीर रक्कम आहे का?
उत्तर: हा आरोप पूर्णपणे खोटा आहे. जर कोणाला इथे एक रुपयाही दान करायचा असेल तर त्यांना पॅन कार्ड क्रमांक विचारला जातो. जर नंबर दिला नाही तर आमचे पोर्टल ते डोनेशन नाकारते. अशा परिस्थितीत, देश आणि जगभरातील लोक स्वेच्छेने पैसे दान करतात. उदाहरणार्थ, हैदराबादमध्ये एक दहा वर्षांची मुलगी आहे. तिला तिच्या वाढदिवसाला मिळालेल्या दहा हजार भेटवस्तू, तिने आमच्या फाऊंडेशनला दिल्या. एक माणूस बंगळुरुमध्ये आहे. तो त्याच्या पगारातील 10% रक्कम आमच्या फाउंडेशनला देतो. अशी अनेक उदाहरणे आहेत. आता ते सर्व अनआयडेंटिफाइड कसे झाले?

प्रश्न: एनजीओचे कार्यालय सिंगापूरमध्ये देखील आहे?

उत्तर: तेथे कोणतेही कार्यालय नाही. स्वयंसेवी संस्थेची स्थापना सहा महिन्यांपूर्वी झाली. अशा स्थितीत आम्ही दुसरे कार्यालय कोठून उघडणार? व्यवस्थापक निश्चितपणे दुबईत राहतो. आमचे कार्यालय फक्त मुंबईत आहे. एनजीओच्या माध्यमातून किती लोकांना मदत झाली हे मोजण्यासाठी बसलो तर त्याला 25 दिवस लागतील.

प्रश्न: तर मग छापा किंवा सर्वेक्षण का? सेवा देण्यासाठी किंवा परेदशातील लोकांना एअरलिफ्ट करण्यासाठी पैसे कोठून आले?

उत्तर: अनेक ठिकाणी आम्हाला विमान कंपन्यांची मदत मिळाली आहे. जिथे इतरांकडून तिकिटासाठी 45 हजार घेतले जातात, तिथे आमच्याकडे फक्त 30 हजार आकारले गेले. परदेशातून एअरलिफ्ट केलेल्या सर्व लोकांसाठी आम्ही कुठेही असे म्हटले नाही की आम्ही रक्कम भरली. आम्ही सांगितले की आम्ही सर्वकाही अरेंज केले. आमच्याकडे त्याची सर्व कायदेशीर कागदपत्रे आहेत. विविध राज्यांच्या डीएमने रेमडिसिव्हर इंजेक्शन देण्यात मदत केली. इस्पितळांशी टायअप आहेत. फाउंडेशनने दहा लाखांची शस्त्रक्रिया दीड लाख रुपयांमध्ये केली.

प्रश्न: असेही म्हटले जात आहे की सोनू सूद स्वतः पद्मश्री वगैरे आणि भाजपमध्ये सदस्यत्व मागत होता?

उत्तर: नाही, नाही, नाही. नक्कीच नाही. आमचा कोणताही राजकीय अजेंडा नाही. त्या सर्व गोष्टींसाठी त्याने कधीही स्वतःला नामांकित केले नाही. खरे सांगायचे तर पद्मश्रीचा प्रस्ताव आला होता. पण सोनूने प्रतिसाद दिला नाही. सोनूला भाजपकडून पुरस्कार हवा होता असे मुळीच नव्हते. कोरोनाच्या काळात, सोनूची कोणतीही सेवा कोणत्याही प्रकारच्या इच्छेच्या दृष्टीने नव्हती. त्या बदल्यात त्याला काहीही नको आहे.

बातम्या आणखी आहेत...