आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हायरल व्हिडिओ:दररोज 4 तासांच्या मेकओव्हरनंतर चांद बरदाईचा लूकमध्ये तयार होत असे सोनू सूद, ट्रान्सफॉर्मेशन व्हिडिओ केला शेअर

20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बघा व्हिडिओ -

अभिनेता सोनू सूदने अलीकडेच 'सम्राट पृथ्वीराज' या चित्रपटात चांद बरदाईच्या भूमिकेत उत्कृष्ट अभिनय केला आहे. आता सोनूने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक बीटीएस (behind the scene) व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्याचा लूकमागे लोकांनी घेतलेली मेहनत दाखवण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये सोनू सूद त्याच्या लूकसाठी तयार होताना दिसत आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 'सम्राट पृथ्वीराज' हा चित्रपट 3 जूनला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या भूमिकेत आहे, तर मानुषी छिल्लरने त्यांची पत्नी संयोगिताच्या भूमिकेतून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. या चित्रपटात संजय दत्त, सोनू सूद, मानव विज, आशुतोष राणा आणि साक्षी तन्वर यांच्याही प्रमुख भूमिका होत्या.

बातम्या आणखी आहेत...