आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

फनी:लॉकडाऊनमध्ये पतीसोबत राहून कंटाळलेल्या महिलेने सोनू सूदकडे मागितली मदत, अभिनेत्याने दिले 'हे' भन्नाट उत्तर 

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अभिनेता सोनू सूद ज्याप्रकारे सोशल मीडियावर चाहत्यांना उत्तरे देतोय, त्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे.
Advertisement
Advertisement

स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी सोनू सूद  सर्व प्रयत्न करित आहे. आतापर्यंत त्याने शेकडो लोकांना त्यांच्या घरी पाठवले आहे. दरम्यान अनेक लोक सोनूकडे मदत मागत आहेत. अशातच एका महिलेने सोनूकडे एक वेगळीच मदत मागितली आहे.  ‘एकतर माझ्या पतीला बाहेर पाठव किंवा मला तरी माहेरी पाठव’, असे त्या महिलेने ट्विट करुन सोनूला टॅग केले आहे. यावर सोनूने त्या महिलेला भन्नाट उत्तर दिले आहे. 

‘जनता कर्फ्यू पासून लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यापर्यंत मी माझ्या पतीसोबत राहतेय. तू कृपया त्याला बाहेर पाठवू शकतोस का किंवा मला तरी माहेरी पाठव कारण मी त्याच्यासोबत आणखी काळ नाही राहू शकत’, असे त्या महिलेने ट्विट केले आहे. यावर सोनू सूदने चांगलाच उपाय शोधून काढला. ‘माझ्याकडे चांगला प्लान आहे. तुम्हा दोघांना मी गोव्याला पाठवतो. काय म्हणता?’, असे उत्तर सोनू सूदने त्या महिलेला दिले आहे.

यापूर्वीही लोकांनी केली सोनूकडे हटके मागणी 

यापूर्वी एका महिलेने ट्विटरवर सोनूला तिला पार्लरमध्ये नेण्याची विनंती केली होती. या महिलेने सोनूला विनंती करत म्हटले होते, ''सोनूजी गेल्या दोन महिन्यांपासून मी पार्लमध्ये गेले नाही. कृपया मला तिथे नेऊन सोडता का?'' या विनंतीवर सोनू म्हणाला, “सलॉनमध्ये जाऊन काय करशील? सलॉन चालवणाऱ्याला तर मी गावाला सोडून आलोय. त्याच्या मागोमाग गावाला जायचे असेल तर बोला.” 

तर एका ट्विटर यूजरने आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी बिहारला जायचे आहे. त्यासाठी मदत करण्याची विनंती सोनूकडे केली होती. या प्रेमवीराला सोनूनेदेखील गंमतीशीर उत्तर दिले होते. तो म्हणाला होता, “थोडे दिवस तिच्यापासून दूर राहा. खऱ्या प्रेमाची परीक्षा होईल.” 

Advertisement
0