आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अभिनेता सोनू सूद सध्या स्थलांतरित मजुरांना घरी पोहोचवत असल्यामुळे चर्चेत आहे. मदत करण्याची प्रेरणा आई-वडिलांकडून मिळाल्याचे सोनू सांगतो. १९९९ मध्ये कल्लाझागर या तामिळ चित्रपटातून कारकीर्दीची सुरुवात करणारा सोनूने आतापर्यंत १०० हून जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे. यात हिंदी, तामिळ, कन्नड आणि इंग्रजीशिवाय कुंग फू योगा या चायनीज चित्रपटाचाही समावेश आहे. मोंगा येथील रहिवासी असलेल्या सोनूचे वडील कपड्याचे व्यापारी, तर आई इंग्रजीची प्राध्यापिका होती. ७० च्या दशकात पंजाबमध्ये गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली होती. अशा वेळी आई-वडिलांनी शिक्षणासाठी पंजाबबाहेर जाण्याचा सल्ला दिला.
पदवी करण्यासाठी सोनूने नागपूर गाठले. इंजिनिअरिंग महाविद्यालयातील दुसऱ्या वर्षात सोनूला मित्रांनी अभिनय आणि मॉडेलिंगसाठी प्रोत्साहन दिले. यापूर्वी सोनूने कधीही नाटकात किंवा इतर ठिकाणी अभिनय केला नव्हता. मित्रांच्या सांगण्यावरून मॉडेलिंगला सुरुवात केली. पदवीनंतर सोनू १९९६ ला मुंबईत पोहोचला. येथे त्याचा संघर्ष सुरू झाला. घरून पैसे घ्यायचे नव्हते म्हणून नोकरी केली. नोकरीतून वेळ काढून आपले फोटो स्टुडिओत द्यायचा. मात्र प्रतिसाद मिळत नव्हता. सात महिन्यांनी सोनू दिल्लीला रवाना झाला. पहिली संधी ‘नागराज’ या जाहिरातीत मिळाली. दिल्लीत मॉडेलिंग करताना तामिळ चित्रपटात काम करण्याची ऑफर मिळाली. यानंतर त्याने वेग पकडला.
संघर्षमय जीवनाबाबत ‘लाइफ इज अ फुल सर्कल’ असे ट्विट केले
ट्विटवर एका युजरने सोनू सूदच्या संघर्षाच्या दिवसांची आठवण काढत एक रेल्वे पास शेअर केला. सोनूने रीट्विट करत लिहिले की, लाइफ इज अ फुल सर्कल. तो रोज नोकरीसोबत आपले फोटो स्टुडिओत देण्यासाठी लोकल ट्रेनने प्रवास करायचा. बोरिवलीपासून ते चर्चगेटपर्यंतचा प्रवासासाठी हा पास ४२० रुपयांमध्ये तयार केला होता. ही १९९० ची गोष्ट आहे.
हँडसम सोनू जिममध्ये घालवतो अडीच तास, शाकाहारी आहे
सोनू वेबइंडियाच्या पब्लिक पोलमध्ये देशातील सर्वोच्च १०० हँडसम पुरुषांमध्ये निवडला गेला आहे. तो जिममध्ये दररोज दोन ते अडीच तास घाम गाळतो. व्यायामाची सुरुवात २० मिनिटांच्या कार्डियो एक्झरसाइजने करतो. कार्डियोनंतर अॅब्स एक्झरसाइजनंतर वेट ट्रेनिंग करतो. तो स्विमिंग, सायकलिंग, ब्रिक्स वॉक, किक बॉक्सिंग आणि योगही करतो. सोनू शाकाहारी आहे. मात्र प्रोटीनसाठी अंडी खातो. तो सप्लिमेंट्सही घेत नाही.
तामिळ येण्यासाठी आईने पाठवले पुस्तक
सोनू सुदला १९९९ मध्ये ‘कल्लाझागर’ चित्रपटात संधी मिळाली. पहिल्या चित्रपटानंतर सोनूच्या आईने त्याला तामिळ शिकण्यासाठी एक पुस्तक पाठवले. भाषा शिकण्यासाठी त्याने दिवसरात्र कष्ट घेतले. यानंतर त्याला तेलुगू आणि कन्नड चित्रपटांमध्येही संधी मिळू लागली. सोनूने २००२ मध्ये शहीद-ए-आझम या पहिल्या हिंदी चित्रपटात अभिनय केला. यानंतर दिग्दर्शक मणिरत्न यांच्या युवा चित्रपटात त्याने अभिषेक बच्चनच्या भावाची भूमिका साकारली. सोनूच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांत जोधा अकबर, दबंग, हॅप्पी न्यू इयर आणि सिंबासारखे चित्रपट आहेत.
जॅकी चॅनसोबत केले आहे शूट, चीनमध्येही लोकप्रिय
२०१७ च्या ‘कुंग फू’ योगा या चित्रपटात सोनूने अभिनय केला आहे. हा चित्रपट चीनशिवाय भारतातही प्रदर्शित झाला होता. यासाठी सोनूने चीनमध्ये बीजिंगमघ्ये राहून जॅकी चॅनच्या मुलासोबत सात महिने प्रशिक्षण घेतले. चित्रपटाच्या गरजेनुसार येथे उणे १० डिग्री तापमानात प्रशिक्षण व्हायचे. ‘कुंग फू’ चित्रपटाचे भारतातील प्रमोशन सोनूनेच केले होते. जॅकी चॅनही सोनूच्या विनंतीने २०१७ मध्ये एका दिवसासाठी भारतात आले होते. चीनमध्येही सोनू लोकप्रिय आहे.
जन्म- ३० जुलै १९७३ (पतियाळा, पंजाब)
शिक्षण- इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नागपूर
पुरस्कार- आयफा २०११ बेस्ट अॅक्टर इन निगेटिव्ह रोल (दबंग), फिल्मफेअर बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर (तेलगू चित्रपटासाठी)
उद्योग- शक्ती सागर प्रॉडक्शन हाऊस, लव्ह लाते हॉटेल फ्रेचांइजी, शॉपिंग मॉल (पंजाब)
कुटुंंब- पत्नी सोनाली, मुले- इशांत, अयान
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.