आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भास्कर एक्सक्लूझिव्ह:सोनू सूद म्हणाला - आयटी छाप्यादरम्यान माझ्याकडे 53 हजार न वाचलेले मेल्स आणि मदतीसाठी 8 हजार मेसेज आले होते; मदतकार्य असेच सुरू राहणार

अमित कर्णएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोनूने सर्व प्रकरणावर आपले मत मांडले आहे.

कोरोना काळात लोकांच्या मदतीसाठी पुढे आलेला आणि गरीबांसाठी मसीहा ठरलेल्या सोनू सूदच्या घरासह इतर अनेक ठिकाणांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या होत्या. आयकर विभाग या कारवाईला सर्वेक्षणाचा भाग म्हणत आहे, तर सोनू सूदच्या निकटवर्तीयांनी मात्र या कारवाईला आयकर विभागाचा छापा असे म्हटले आहे. अखेर सोनू सूदने आता स्वतः पुढे येत या विषयावर आपली बाजू मांडली आहे. दैनिक भास्करसोबत झालेल्या बातचीतदरम्यान सोनू सूदने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. सोनू सूदसोबत झालेल्या संभाषणाचा हा खास भाग...

प्रश्न: या कारवाईने तुला मजबूत केले की तुझा आत्मविश्वास डळमळीत झाला आहे?
उत्तर:
या कारवाईने काहीही बदलले नाही. आजही लोक माझ्या घराखाली उभे आहेत. कालही उभे होते आणि उद्याही असतील. माझे काम लोकांना मदत करणे आहे आणि मी ते करत राहणार आहे. त्या लोकांनी त्यांचे काम केले, मी माझे काम करत राहणार. कारण हे काम थांबण्यासाठी सुरू झालेले नाही. ही तर फक्त सुरुवात आहे. अजून लांबचा पल्ला गाठायचा आहे. लोकांच्या प्रार्थनेने सर्व काही ठीक होईल.

प्रश्न: आता तू अजून किती सामर्थ्याने लोकांना मदत करत राहणार?
उत्तर:
मला लोकांचा खूप पाठिंबा मिळाला आहे. आम्ही जे काम सुरू केले आहे, ते आम्हाला अधिक प्रेरित करते. या कारवाईनंतर लोकांचा माझ्यावरील विश्वास दृढ झाला आहे. लोकांनी म्हटले आहे, 'आम्ही तुमच्यासोबत आहोत.' मी अधिक काम करत राहणार. माझ्या मते, लोकांचा आत्मविश्वास आणखी वाढला आहे.

प्रश्न: फाउंडेशनमध्ये कोणत्या प्रकारचे बदल घडतील?
उत्तर: फाउंडेशन एक अद्भुत काम करत आहे. शेकडो लोक ज्यांची अद्याप शस्त्रक्रिया झालेली नाही त्यांची काळजी घेत आहेत. अनेक विद्यार्थ्यांना शिकवायचे आहे, त्यांच्याकडे आम्ही लक्ष देत आहोत. ख-या अर्थाने, फाउंडेशन पूर्वीपेक्षा अधिक चांगले काम करत आहे आणि पुढेही करत राहील. जर एखाद्या व्यक्तीने ठरवले की त्याला लोकांचे जीवन बदलायचे आहे, तर फारसा फरक पडत नाही. केवळ तुम्ही तुमच्या मनापासून काम करा, कारण उद्देश आणि गंतव्य दोन्ही खूप मोठे आहेत. मदत करण्याची जी योजना आहे ती प्रचंड मोठी आहे. छोट्या गोष्टींमुळे यावर फरक पडता कामा नये. हा माझा विचार आहे.

प्रश्न: आतादेखील दररोज किती लोकांच्या मदतीसाठी विनंत्या येत आहेत?
उत्तर
: 'ते' आले होते, तेव्हा माझ्याकडे सुमारे 53 हजार न वाचलेले ईमेल होते. 8 हजार न वाचलेले मेसेजेस होते. अंदाजे 1.5 ते 2 लाख लोक दर चार ते पाच दिवसाला आमच्याकडे येतात. प्रत्येकाला फिजिकली मदत करणे शक्य होत नाही, परंतु आम्ही टीम वाढवत राहण्याचा प्रयत्न करत आहोत, जेणेकरून आम्ही लोकांना मदत करत राहू. लोकांनी आमच्यावर ठेवलेला विश्वास आणि जबाबदारी योग्यरित्या निभावणे, हा आमचा प्रयत्न आहे. अधिकाधिक लोकांना वैद्यकीय, शैक्षणिक सुविधा द्यायची आहे.

प्रश्न: या कारवाईचा तुझ्या कुटुंबावर किती परिणाम झाला, त्यांनी ते कसे हाताळले?
उत्तर:
संपूर्ण कुटुंब आणखीन मजबूत झाले आहे. ते म्हणाले की, अडचणी येतच राहतात. आम्ही एवढ्यावर थांबू असे मला वाटत नाही. आम्ही लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचे जे वचन दिले आहे, ते निभावत राहू.

प्रश्न: आता हे प्रकरण न्यायालयात जात आहे का, तू तुझ्या चाहत्यांना काय सांगू इच्छितो?
उत्तर:
मदतीचा ओघ असाच सुरू राहील. आजही जेव्हा मी खिडकीतून बाहेर पाहतो तेव्हा खाली बरेच लोक उभे असतात. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात. लोक त्यांची सायकल, कुलर किंवा कोणताही मोबाईल विकून आमच्यापर्यंत पोहोचतात. मी त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन.

प्रश्न: ही एक रुटीन कारवाई होती का?
उत्तर:
आम्ही सर्व कागदपत्रे सादर केली आहेत. जे काही मागितले, ते आम्ही देऊ आणि त्यांना देत राहू. आम्ही नेहमीच देशाच्या हितासाठी उभे आहोत आणि उभे राहू. मला वाटते जर तुम्ही तुमची विचारसरणी वाढवली तर लहान अडचणी तुमचा मार्ग रोखू शकत नाहीत.

बातम्या आणखी आहेत...