आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाखत:सोनू सूद म्हणतो - एकही दिग्दर्शक मला खलनायकाची भूमिका देईना, नवीन इनिंग नुकतीच सुरू झाली आहे

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोनूची स्क्रीन इमेज बदलली आहे.

सोनू सूद आपल्या मोठ्या मनामुळे चर्चेत आहे. तो सतत लोकांसाठी काही ना काही करत आहे. त्यामुळे त्याची स्क्रीन इमेजही बदलली आहे. त्याच्यासोबत झालेली खास बातचीत...

  • तुझ्या आईच्या नावाने एका रस्त्याचे नाव ठेवण्यात आले आहे. तुला कसे वाटत आहे ?

माझ्या आयुष्यातील हा सर्वात महत्वाचा दिवस आहे. या दिवशी माझी आई प्रोफेसर सरोज सूद यांच्या नावावरुन रस्त्याचे नाव पडले. ज्या रस्त्यावरुन स्कूटरवर रोज शाळेत जायचो, वडील दुकानात जात असत आणि आई स्कूटरवर शिकवायला जायची. मला वाटते हा एक मोठा विशेष क्षण आहे. जेव्हा आई या रोडवर स्कूटरने कॉलेजला सोडत असे तेव्हा खूप छान वाटायचे. आज जेव्हा मी पंजाबला त्या रस्त्यावरून जातो, तेव्हा त्या आठवणी ताज्या होतात.

  • भविष्यात आईसाठी काही करणार का ?

भविष्यात आईच्या नावावर खूप काही करायचे आहे. शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे, वॉर्ड इत्यादी त्यांच्या नावावर सुरू करायचे आहे. माझ्या आईने शिक्षणामध्ये खूप योगदान, म्हणून मला शिक्षणात तिच्या नावावर आणखी खूप काही करायचे आहे. त्यांच्या नावावर आधीपासूनच प्राध्यापक सरोज शिष्यवृत्ती आहे, जिथे सुमारे दोन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मला याव्यतिरिक्त आणखी काही करायचे आहे. हे माझ्यासाठी खास असेल.

  • सध्या समाजिक सेवेत काय सुरू आहे ?

समाज सेवा ही प्रत्येकाच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे, असे मला वाटते. जास्तीत जास्त लोकांनी एकत्र यावे, प्रेरित व्हावे आणि लोकांना चांगले कार्य करण्याची आणि लोकांचे जीवन बदलण्याची संधी मिळावी, अशी माझी इच्छा आहे. मला वाटतं, ही एक फार महत्वाची नोकरी आहे.

  • चित्रपट कोणते येत आहेत ?

सध्या तर 'पृथ्वीराज'चे शूटिंग संपले आहे. दक्षिणेच्या दोन चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. एकाचे संपले आहे आणि लवकरच सुरू होणार आहे. हेच सुरु आहे. येणारा काळ मजेदार राहिल, असे वाटतेय.

  • आताही पडद्यावर खलनायकाच्या भूमिका साकारशील का ?

सध्या मला खलनायकाच्या भूमिकेच्या ऑफर्स आले नाहीत. खलनायकाच्या भूमिकेत लोक मला स्वीकारणार नाहीत, असे मला वाटते. हीदेखील चांगली गोष्ट आहे. नवीन इनिंग नुकतीच सुरू झाली आहे आणि अजून बरेच काम करायचे बाकी आहे. सुरुवातीच्या काही चित्रपटांमध्ये मी नायक म्हणूनही काम केले आहे. तेव्हाही लोकांना ते आवडले होते.

बातम्या आणखी आहेत...