आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

सोनू सूदने दिलेला शब्द खरा केला:उदरनिर्वाहासाठी रस्त्यावर काठ्यांचा खेळ सादर करायच्या 85 वर्षीय वॉरियर आजी, सोनू सूदने त्यांना मार्शल आर्ट्स क्लास सुरु करुन दिला

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊन दरम्यान 85 वर्षीय शांताबाई पवार कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पुण्याच्या रस्त्यांवर काठ्यांचा खेळ सादर करताना दिसल्या होत्या.
  • गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली होती.

पुण्याच्या हडपसर येथे राहणा-या 85 वर्षीय शांताबाई पवार उर्फ वॉरियर आजी यांना अभिनेता सोनू सूदने मदत करण्याची इच्छा व्यक्त केली होती. सोनूने त्यांना दिलेला आपला शब्द पाळला असून गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर या आजींना मुलींना सेल्फ डिफेन्स शिकवणारे प्रशिक्षण वर्ग सुरु करु दिले आहेत. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शांताबाई पवार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, त्यामध्ये त्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काठ्यांचा खेळ सादर करताना दिसल्या होत्या. त्यांचा हा व्हिडिओ पाहून सोनू सूदने त्यांना मार्शल आर्ट स्कूल सुरु करुन देण्याची घोषणा केली होती.

On the occasion of #GaneshChaurthi, @Sonu_Sood opens a martial arts school for the warrior grandma Shanta Pawar whose video went viral on the internet. The messiah of migrants opened the school for her so that she can teach women & young children self-defence techniques. In order to express her gratitude, she has named the school as Sonu Sood Martial Arts School & he has promised that he will visit the school at the earliest! #sonusood #aajishantipawar

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on Aug 23, 2020 at 12:17am PDT

>

  • आजींनी सोनू सूदच्या नावाने सुरु केले प्रशिक्षण वर्ग

वॉरियर आजींनी सोनू सूदचे आभार मानले असून आपल्या प्रशिक्षण वर्गाला सोनू सूद मार्शल आर्ट्स स्कूल असे नाव दिले आहे. त्यांचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यात त्या सोनूचे आभार व्यक्त करताना दिसत आहेत. 'माझी इच्छा होती की मुलांना लाठी-काठींचे प्रशिक्षण द्यावे, ती इच्छा सोनू सूद यांनी पूर्ण केली आहे. आणि मी याचे नाव सोनू सूदच्या नावावर ठेवले आहे. मी खूप आनंदी आहे", असे शांताबाई पवार यांनी म्हटले आहे.

आजींनी या प्रशिक्षण वर्गात मुलांना ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली आहे.
आजींनी या प्रशिक्षण वर्गात मुलांना ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली आहे.
  • सोनूने ट्विट करुन विचारला होता आजीबाईंचा पत्ता

एका व्यक्तीने 24 जुलै रोजी शांताबाई पवार यांचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला होता. तो व्हिडिओ पाहून सोनूने त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला होता. शांताबाईंच्या संपर्काचा तपशील विचारत सोनूने ट्विट केले होते, ‘मला या आजीबाईंची माहिती मिळू शकेल का? त्यांच्यासोबत एक छोटी प्रशिक्षण शाळा उघडायची आहे जिथे त्या आपल्या देशातील महिलांना स्वयंरक्षणासाठी काही गोष्टी शिकवू शकतील’, असे सोनू म्हणाला होता.

आजी पुण्याच्या एका झोपडपट्टीत वास्तव्याला आहेत.
आजी पुण्याच्या एका झोपडपट्टीत वास्तव्याला आहेत.

आपण या प्रशिक्षण वर्गाला लवकरच भेट देऊ असा शब्दही सोनू सूदने या आजींना दिला आहे.

पुण्याच्या हडपसर येथे येऊन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आजींना आर्थिक मदत केली होती.
पुण्याच्या हडपसर येथे येऊन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आजींना आर्थिक मदत केली होती.
  • गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली होती 1 लाख रुपयांची आर्थिक मदत

शांताबाई पवार यांचा व्हायरल व्हिडिओ गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पर्यंतही पोहोचला होता, त्यानंतर त्यांनी शांताबाई यांना भेट म्हणून साडी दिली आणि 1 लाख रुपयांचा धनादेश दिला होता. शांताबाई यांनी अनिल देशमुख यांच्यासाठी काठीचा खेळही सादर केला होता. याबाबत गृहमंत्री म्हणाले होते, "त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि मला त्यांच्याशी भेटण्याची तीव्र इच्छा होती, म्हणून आज मी त्यांना भेटायला त्यांच्या घरी आलो आहे."

अभिनेता रितेश देशमुखनेही आजींचा व्हिडिओ शेअर करुन मदतीचा हात पुढे केला होता.

  • अनेकांनी केली मदत

शांताबाई पवार यांनी सीता-गीता आणि शेरनी या चित्रपटांमध्ये काम केले. सध्या त्या पुण्यात वास्तव्याला आहेत. कोरोना संकटाच्या काळात आपलं आणि नातंवंडांच पोट भरण्यासाठी शांताबाई पवार यांना लाठ्या- काठ्यांचा खेळ रस्त्यावर खेळावा लागत आहे. त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकजण त्यांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.

0