आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मदतीचा हात:घरी परत जाण्यासाठी सोनू सूदकडे मदत मागत आहेत लोक, विद्यार्थ्याला ट्विट करुन म्हणाला - ‘आईला सांग रडू नकोस, मी लवकरच घरी येतोय’ 

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोनू सूदने लॉकडाऊनच्या काळात कर्नाटक, बिहार, झारखंड येथील मजुरांना त्यांच्या गावी पाठविले आहे.

कोरोनाच्या लढ्यात अभिनेता सोनू सूद गरजुंच्या मदतीसाठी वेळोवेळी पुढे येतोय. सध्या परराज्यातून कामासाठी मुंबईत आलेल्या मजुरांची त्यांच्या गावी परत जाण्यासाठी धडपड सुरु आहे. सोनूने या मजुरांना त्यांच्या घरी पोहचवण्याची जबाबदारी उचलली आहे. अशातच अडचणीत सापडलेले विद्यार्थीही त्याच्याकडे मदत मागत आहेत. विशेष म्हणजे सोनूने या विद्यार्थ्यांना निराश केलेले नाही आणि त्यांना घरी जाण्यासाठी सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.  

सोनू सूदने लॉकडाऊनच्या काळात कर्नाटक, बिहार, झारखंड येथील मजुरांना त्यांच्या गावी पाठविले आहे. यामध्ये ठाण्यात अडकलेल्या गोरखपूरच्या एका विद्यार्थ्याने सोनूकडे मदतीची मागणी करत आम्हाला आमच्या गावी जाण्यासाठी मदत करा असे ट्विट करुन सांगितले.  “मी उत्तर प्रदेशमधील गोरखपूरचा रहिवासी असून सध्या शिक्षणासाठी ठाण्यात राहतो. मात्र माझी आई आजारी आहे आणि मी इकडे अडकलो आहे. कोणीच माझी मदत करत नाहीये. मला माझ्या गावी गोरखपूरला जायचं आहे, तुम्हीच माझी शेवटची आशा आहात. कृपया माझी मदत करा”, असे ट्विट या मुलाने केले.  त्यावर उत्तर देताना 'तुझ्या आईला कळवं, तू लवकरच तिला भेटायला जात आहे', असे सोनूने त्याला सांगितले आहे.  

दरम्यान, सोनू आणि या विद्यार्थ्याचे ट्विट पाहिल्यानंतर आणखी एका विद्यार्थ्याने सोनूला मीदेखील गोरखपूरचा रहिवासी असून मलासुद्धा आकाशसोबत घरी जाता येईल का असा प्रश्न विचारला. त्यावर सोनूने त्याचीही मदत करु असे सांगितले. 

  • बघा आणखी काही ट्वीट ज्यात सोनूने मदतीचे आश्वासन दिले आहे.
  • मी मदतीसाठी सर्वकाही पणाला लावेल

परराज्यातील मजुरांना त्यांच्या घरी पाठवण्याची व्यवस्था करणारा सोनू म्हणाला, 'हा माझ्यासाठी खूप भावनिक प्रवास आहे कारण या लोकांना घराबाहेर रस्त्यावर फिरताना पाहून मला फार वाईट वाटले. जोवर शेवटची व्यक्ती त्यांच्या प्रियजनांना भेटणार नाही, तोपर्यंत मी त्यांना घरी पाठवण्याचे काम सुरु ठेवेले. हे कार्य खरोखर माझ्या मनाच्या खूप जवळ आहे आणि मी माझे सर्व काही त्यासाठी पणाला लावेल.'

यापूर्वी सोनूने मदत केली आहे

  • अलीकडेच सोनूने मुंबईत अडकलेल्या कर्नाटकातील 350 हून अधिक मजुरांना मदत केली आणि त्यांना गुलबर्गा येथे पाठवले. यासाठी त्याने दहा बसचा संपूर्ण खर्च उचलला. दोन्ही राज्यांकडून सर्व प्रकारच्या परवानगी मिळाल्यानंतर त्याने हे काम केले.
  • रमजान महिन्यात वंचित कुटुंबांमध्ये अन्न वाटप करण्याचीही व्यवस्था केली आहे. भिवंडी भागातील परप्रांतीयांना तो भोजन पुरवित आहेत.
  • सोनूने मुंबईतील आपले हॉटेल कोरोनाशी लढणार्‍या वैद्यकीय कर्मचा-यांना दिले आहे.
  • याखेरीज पंजाबमधील डॉक्टरांना 1,500 हून अधिक पीपीई किट देखील वितरित करण्यात आल्या आहेत.
बातम्या आणखी आहेत...