आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनू सूदविरोधात कारवाई:मुंबईत अभिनेत्याच्या सहा ठिकाणी इनकम टॅक्स विभागाची पाहणी, अधिकारी ऑफिसमध्ये कागदपत्रांची करत आहेत तपासणी

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अधिकाऱ्यांकडून सोनू सूदच्या कार्यालयाची पाहणी केली जात आहे.

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या मुंबईस्थित ऑफिसमध्ये इनकम टॅक्सचे अधिकारी चौकशीसाठी पोहोचले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार अधिकाऱ्यांकडून सोनू सूदच्या कार्यालयाची पाहणी केली जात आहे. सोनू सूदची नुकतीच दिल्ली सरकारच्या शाळकरी विद्यार्थीसाठीच्या अभियानासाठी ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली असून त्यानंतर काही दिवसांतच इनकम टॅक्स विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

सोनू सूदला यावेळी राजकारणात प्रवेश करण्याच्या दृष्टीने भेट झाल्यासंबंधी विचारण्यात आले होते. यावेळी त्याने आपण राजकारणात प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केले होते. आम आदमी पक्षातील नेत्यांच्या भेटीनंतर सोनू सूद राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती.

लॉकडाऊननंतर सोनू सूद आला चर्चेत
48 वर्षीय सोनू सूद लॉकडाऊननंतर चर्चेत आला. सोनूने लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या अनेक परप्रांतीयांना त्यांच्या घरी पोहोचवण्याचे काम केले होते. इतकंच नाही तर अनेकांसाठी जेवणासोबत राहण्याची, रोजगाराचीही त्याने व्यवस्था केली होती. लॉकडाऊनच्या काळात त्याने केलेल्या समाजकार्यामुळे त्याच्यावर सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव होत होता. यामुळे त्याच्या राजकारणातील चर्चाही रंगल्या होत्या. मात्र सोनू सूदने या चर्चा अफवा असल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...