आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इमारतीचे हॉटेलमध्ये रुपांतर करण्याचे प्रकरण:अभिनेता सोनू सूदने सुप्रीम कोर्टात दाखल केलेली याचिका मागे घेतली; हायकोर्टाच्या निकालाला दिले होते आव्हान

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सूदचा दावा - बेकायदेशीर बांधकाम नाही

मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) अभिनेता सोनू सूदला अवैध बांधकाम पाडण्याची नोटीस बजावली होती. बीएमसीची कारवाईची नोटीस मिळाल्यानंतर सोनूने सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. मात्र आता सोनूने आपली याचिका मागे घेतली आहे. बीएमसीला दिलेल्या निवेदनावरील निर्णयाची सोनू सूद प्रतीक्षा करेल, असे सांगण्यात येत आहे. त्याचे वकील मुकुल रोहतगी यांनी कोर्टाला सांगितले की - सोनूने स्वत:ची बाजू बीएमसीसमोर मांडली आहे. त्यांच्या निर्णयाची तो आता प्रतीक्षा करेल.

काही दिवसांपूर्वी मुंबई महानगरपालिकेने सोनू सूदला अवैध बांधकामप्रकरणी नोटीस बजावली होती. मुंबई महानगरपालिकेने नोटीस बजावल्यानंतर सोनू सूदने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, त्याची याचिका न्यायालयाने फेटाळली होती. कोर्टात झालेल्या सुनावणीमध्ये महानगरपालिकेने केलेली कारवाई योग्य असल्याचा निर्वाळा कोर्टाने दिला होता. सोनूने अ‍ॅड. डी. पी. सिंह यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सोनू सूद हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात पोहोचला होता. यापूर्वी मागील महिन्याच्या सुरूवातीलाच सोनूची याचिका शहर दिवाणी कोर्टानेसुद्धा फेटाळली होती.

मुंबई हायकोर्टाचे न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या एकल खंडपीठाला महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम कलम 53 अन्वये सोनूचा अर्ज चुकीचा असल्याचे आढळले. मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात सोनूचे “सवयीने गुन्हेगार’ असे वर्णन केले होते. बीएमसीने सांगितले होते की, सोनू सूदने असे पहिल्यांदाच केले नाही तर यापूर्वी जुहू येथील निवासी इमारतीत सतत अनधिकृत बांधकाम केले आहे. अतिक्रमण हटवण्यासाठी दाेन वेळा कारवाईही करण्यात आली. बीएमसीने मागील वर्षी ऑक्टाेबरमध्ये साेनू सूदला नाेटीस बजावली हाेती. त्यानंतर साेनू सूदने मुंबई हाय कोर्टात धाव घेतली होती.

शक्ती सागर इमारतीचे हॉटेलमध्ये रुपांतर केल्याचा आरोप सोनू सूदवर आहे. याप्रकरणी बीएमसीने त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
शक्ती सागर इमारतीचे हॉटेलमध्ये रुपांतर केल्याचा आरोप सोनू सूदवर आहे. याप्रकरणी बीएमसीने त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

सूदचा दावा - बेकायदेशीर बांधकाम नाही
यापूर्वी हायकोर्टाच्या सुनावणीदरम्यान सोनूचे वकील अमोघ सिंह यांनी दावा केला होता की, शक्ती सागर इमारतीत बीएमसीच्या परवानगीची गरज भासेल, असे कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. केवळ तेच बदल करण्यात आले आहे, ज्यासाठी महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडून परवानगीची गरज असते.

बातम्या आणखी आहेत...