आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनूच्या ऑफिसवर आयटीचा छापा:एकेकाळी 5500 रुपये घेऊन मुंबईत आला होता सोनू सूद, आज आहे 130 कोटींच्या संपत्तीचा मालक

11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोनू सूद एका चित्रपटासाठी 2 कोटी घेतो

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या मुंबईस्थित ऑफिसमध्ये इनकम टॅक्सचे अधिकारी चौकशी करत आहेत. या चौकशीमागील नेमक्या कारणाचा खुलासा झालेला नाही. पण या चौकशीनंतर लोक सोनूच्या नेटवर्थबद्दस जाणून घेण्यास उत्सुक आहेत. एकेकाळी सोनू केवळ 5500 रुपये घेऊन मुंबईत आला होता. आणि आज तो सुमारे 130 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे.

एका चित्रपटासाठी 2 कोटी घेतो
caknowledge.com च्या अहवालानुसार, सप्टेंबर 2021 पर्यंत सोनू सूदची एकुण संपत्ती 130 कोटी रुपये (17 मिलियन डॉलर) आहे. सोनू सध्या पत्नी आणि मुलांसह मुंबईत राहतो. सोनू हिंदी, तेलुगु,
तामिळ, कन्नड आणि पंजाबी चित्रपटांतील अभिनयासाठी ओळखला जातो. ब्रँड एंडोर्समेंट हेदेखील त्याच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहे. तो प्रत्येक चित्रपटासाठी सुमारे 2 कोटी रुपये मानधन घेतो. सोनूचे शक्ती सागर प्रॉडक्शन नावाचे स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस आहे. हे त्याच्या वडिलांच्या नावावर आहे.

सोनूने आतापर्यंत सुमारे 70 चित्रपटांमध्ये काम केले आहे. ब्रँड एंडोर्समेंट्स आणि चित्रपटांमधून तो दरमहा सुमारे एक कोटी रुपये कमावतो म्हणजेच एका वर्षात एकूण 12 कोटी.

घर आणि कार कलेक्शन
सोनू अंधेरीच्या लोखंडवाला येथील 2600 चौरस फूट 4 बीएचके अपार्टमेंटमध्ये आपल्या कुटुंबासह राहतो. याशिवाय त्याचे मुंबईत आणखी दोन फ्लॅट आहेत. त्याचा मोगा येथे बंगला आहे. जुहूमध्ये त्याचे हॉटेल आहे. जे त्याने लॉकडाऊन दरम्यान आयसोलेशन सेंटरसाठी उघडले. याशिवाय, सोनूच्या कार कलेक्शनमध्ये 66 लाख रुपये किमतीची मर्सिडीज बेंझ एमएल क्लास 350 सीडीआय, 80 लाख किमतीची ऑडी क्यू 7 आणि 2 कोटी किमतीची पोर्श पनामा यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...