आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदतीचा हात:कोरोनाशी लढणा-या आरोग्य कर्मचा-यांच्या मदतीसाठी पुढे आला सोनू सुद, कर्मचा-यांना राहण्यासाठी दिले स्वत:चे 6 मजली हॉटेल

मुंबई3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोनूने सोशल मीडिया हँडलच्या माध्यमातून चाहत्यांना घरीच राहण्याचे तसेच सामाजिक अंतर ठेवण्याचे आवाहन केले आहे.

अभिनेता सोनू सूदने कोराना व्हायरसच्या संसर्गापासून दूर राहण्यासाठी मुंबईतील जुहू येथील त्याच्या हॉटेलात डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी राहण्याची व्यवस्था केली आहे. कारण ते स्वत:चा जीव धोक्यात घालून कोरोना व्हायरसची लढाई लढत आहेत. त्याच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य आहे असे त्याचे म्हणणे आहे .

  • सोनू म्हणाला- 'माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे'

याबद्दल बोलताना सोनू म्हणाला, 'सध्याच्या परिस्थितीत देशातील डॉक्टर, परिचारिका आणि पॅरा-मेडिकल स्टाफसाठी काहीतरी करता येणं ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. हे लोक रात्रंदिवस लोकांच्या सेवेत मग्न असतात. ते सर्व मुंबईतील वेगवेगळ्या भागातून आले आहेत आणि त्यांना विश्रांतीसाठी जागा हवी. आम्ही यासंदर्भात मनपा आणि खासगी रुग्णालयांना कळविले आहे आणि या ख-या नायकांसाठी हॉटेलचे दरवाजे उघडण्यात मला खरोखर आनंद झाला आहे.' सोनू पुढे म्हणाले, 'एक समाज म्हणून आपण एकत्रितपणे कोविड -19 विरुद्धची लढाई जिंकू शकतो'.

  • निर्माता सचिन जोशीने क्वारंटाईनसाठी दिले आपले हॉटेल
निर्माता-अभिनेता सचिन जोशी
निर्माता-अभिनेता सचिन जोशी

♦ वाइकिंग ग्रुपचे सीएमडी आणि अभिनेता-निर्माता सचिन जे. जोशीने पवई येथील ‘द बीटल’ हे हॉटेल बीएमसीला क्वारंटाईनच्या वापरासाठी घ्यावे असा प्रस्ताव दिला होता. ते 36 खोल्यांचे आलिशान बुटिक हॉटेल आहे. येथे कोविड 19 मुळे संसर्गित झालेल्या विदेशातून परतलेल्या प्रवाशांना क्वारंटाईन केले जाऊ शकते. दुबईमध्ये अडकलेल्या सचिन जे. जोशी याच्याशी संपर्क कला असता तो म्हणाला, ‘नगरपालिकेने आमच्याशी मदतीसाठी संपर्क साधला असता आम्ही होकार दिला आहे'

  • शाहरुखने दिली ऑफिसची जागा

♦ सोनूपुर्वी अभिनेता शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांनी क्वारंटाईन क्षमता वाढवण्यासाठी मुंबईतील त्यांचे चार मजली ऑफिस बृहन्मुंबई महानगरपालिका म्हणजेच बीएमसीला दिले. महापालिकेने शाहरुख आणि गौरी खानचे आभार मानणारे ट्विट केले होते. या ट्विटमध्ये महापालिकेने म्हटले की, “आपली चार मजली कार्यालयीन इमारत ज्यामध्ये महिला, लहान मुले आणि वृद्धांसाठी गरजेच्या सर्व गोष्टी आहेत ती विलगीकरणासाठी देण्याची ऑफर दिल्याबद्दल शाहरुख आणि गौरी खानचे आभार”.

बातम्या आणखी आहेत...