आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनू सूदचे स्पष्टीकरण:सकाळी गंजमचे जिल्हाधिकारी म्हणाले होते- सोनू खोटे श्रेय घेतोय, संध्याकाळी अभिनेत्याने संभाषणाचा पुरावा केला शेअर

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जिल्हाधिकारी म्हणाले होते, सोनू खोटे बोलत आहे

अभिनेता सोनू सूदने काही स्क्रीनशॉट्स सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे व्हॉट्सअ‍ॅप चॅट्स आहेत, ज्यात गंजम जिल्ह्यातील ब्रह्मपूर येथे गरजूंसाठी बेड्सची सोय करण्याबाबतची चर्चा झाली होती. गंजमच्या जिल्हाधिका-यांनी मात्र सोनूने मदत न करता श्रेय घेतल्याचा दावा केला होता. त्यानंतर सोनूने हे पुरावे शेअर केले आहेत. सोशल मीडियावर याविषयी लिहिले होते की, सोनू सूद किंवा त्याच्या फाउंडेशनने कोणत्याही गरजू व्यक्तीसाठी बेडची व्यवस्था करण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला नाही, परंतु त्यांनी त्याचे श्रेय नक्की घेतले.

सोनूने लिहिले - आम्ही कोणताही दावा केला नव्हता
सोनूने चॅट्सचे स्क्रीनशॉट्स शेअर करत लिहिले, 'सर, आम्ही तुमच्याशी संपर्क साधल्याचा कधीही दावा केला नाही. आमच्याशी संपर्क साधणा-या गरजूंसाठी आम्ही बेड्सची व्यवस्था केली. आपल्या संदर्भासाठी चॅट्स जोडले आहेत. आपले कार्यालय खूप चांगले काम करत आहे,' असे सोनूने म्हटले आहे.

जिल्हाधिकारी म्हणाले होते, सोनू खोटे बोलत आहे
यापूर्वी सोमवारी जेव्हा ही पोस्ट व्हायरल झाली होती, तेव्हा लोकांनी सोनूच्या मदतीवर प्रश्न उपस्थित केले होते. पोस्टमध्ये जिल्हाधिकारी म्हणाले होते की, सोनूने ज्या रुग्णांसाठी बेड्स उपलब्ध करुन दिल्याचे सांगितले, ते सर्वजण होम आयसोलेशनमध्ये आणि स्टेबल आहेत.

बातम्या आणखी आहेत...