आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोनू सूदची प्रकृती:शाकाहारी भोजनाच्या सवयीमुळे कोरोनातून बरे होण्यास मदत झाली, परंतु रूग्णांच्या कुटुंबियांचे वेदनादायक आवाज रात्रभर झोपू देत नाहीये

22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रात्रभर झोपू शकत नाहीये सोनू सूद

अभिनेता सोनू सूदने कोरोनावर यशस्वी मात केली आहे. विशेष बाब म्हणजे अवघ्या सहा दिवसांत सोनूचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. दिव्य मराठीचे प्रतिनिधी अमित कर्ण यांच्याशी झालेल्या खास बातचीतमध्ये सोनूने एवढ्या कमी कालावधीत कोरोनाला पराभूत करण्याचे रहस्य उघड केले. सोनू म्हणाला, "मी शाकाहारी आहे. मला फळे, हिरव्या भाज्या खाण्याची सवय आहे. या काळात मी व्हिटॅमिन, कॅल्शियम, झिंक इत्यादी पदार्थ घेत राहिलो. उर्वरित माझ्या प्रतिकारशक्तीमुळे मला कोरोनामधून बरे होण्यास मदत झाली. सोबतच श्वासाचे व्यायाम देखील खूप केले. 'पॅन डी 40' पासून ताप आल्यास 'डोलोज' आणि नियमित औषधे घेतली. याकाळात मी वाफदेखील घेतली," असे सोनूने सांगितले.

पण रात्रभर झोपू शकत नाहीये सोनू सूद
शनिवारी सोनू सूदने सोशल मीडियावर सांगितले की, तो रात्रभर झोपू शकत नाहीये. कारण मध्यरात्रीसुद्धा त्याला कोविड रूग्णांच्या नातेवाईकांचे मदतीसाठीचे फोन येत आहेत. त्यांची मदतीसाठीची याचना ऐकून अस्वस्थ होतोय, असे सोनू सांगतोय. सोनूने आपल्या एका पोस्टमध्ये यासंदर्भात लिहिले, "झोपू शकत नाहीये. मध्यरात्री माझा फोन वाजतो. मी फोनवर आपल्या आप्तस्वकीयांसाठी मदतीसाठी याचना करणारा निराश आवाज ऐकतो. आपण सर्वजण खूप कठीण काळात जगत आहोत. पण उद्याची सकाळ नक्कीच चांगली असेल. फक्त स्वत:वरची पकड आणखी मजबूत करा. आपणण एकत्र मिळून यातून बाहेर पडू. फक्त आपल्याला आणखी काही हातांची गरज आहे," असे सोनू म्हणाला.

सोनूने व्यक्त केली होती असमर्थता

कोरोनाच्या दुस-या लाटेत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वैद्यकिय व्यवस्था अपुरी पडत आहे. इंजेक्शन, बेड्स आणि औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. गरजुंसाठी बेड्स आणि औषधे उपलब्ध करुन देण्यासाठी सोनूने असमर्थता व्यक्त केली होती. सोनूने यावर चिंता व्यक्त करणारी एक पोस्ट शेअर केली होती. त्याने सोशल मीडियावर लिहिले होते, 'मी सकाळपासून माझा फोन ठेवलेला नाही. देशभरातून हॉस्पिटल, बेड्स, औषधे, इंजेक्शन्स यासाठी हजारो कॉल आहे आणि आतापर्यंत अनेकांना मी ही सुविधा उपलब्ध करुन देऊ शकलेलो नाही. मला असहाय्य वाटत आहे. परिस्थिती खूप भयावह आहे. कृपया घरात राहा, मास्क घाला आणि स्वतःला संसर्ग होण्यापासून वाचवा,' असे सोनू म्हणाला होता.

बातम्या आणखी आहेत...