आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चाहत्यांच्या प्रार्थनांचा प्रभाव:अभिनेता सोनू सूदची कोरोनावर यशस्वी मात, 6 दिवसांत कोरोना अहवाल आला निगेटिव्ह

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आयसोलेशनमध्ये असताना गरजुंसाठी सतत करत होता काम

अभिनेता सोनू सूदला काही दिवसांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाला होता. आता सोनूच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सोनूने कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सहा दिवसांत त्याचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. सोनूने स्वतः सोशल मीडिया अकाउंटवरुन याबद्दल पोस्ट केली आहे. यात त्याने आपला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याने मास्क परिधान केला आहे. तसेच हाताने निगेटिव्ह साईन करत पोझ दिली आहे. त्याने या फोटोला ‘कोरोना अहवाल निगेटिव्ह आला’ असे कॅप्शनही दिले आहे.

आयसोलेशनमध्ये असताना सतत करत होता काम
कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर सोनू सूद घरीच क्वारंटाइन होता. याकाळात त्याने लोकांच्या मदतीसाठी सतत काम करत होता. सोनू आणि त्याची टीम गरजूंना औषधे, बेड, व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन पुरवत आहेत. मात्र, जेवढ्या लोकांनी मदतीसाठी कॉल केले, त्यापैकी काही जणांनाच तो याकाळात मदत करु शकतोय, अशी खंत देखील त्याने व्यक्त केली आहे.

अमृतसरमध्ये घेतला होता कोरोना लसीचा डोस
सोनू सूदला पंजाबमधील व्हॅक्सिनेशन ड्राइव्हचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनवण्यात आले आहे. 7 एप्रिल रोजी सोनूने येथे पोहोचला होता आणि अटारी बॉर्डरवर लसीकरण मोहीम सुरू केली होती. लोकांना जागरूक करण्यासाठी स्वत: सोनूने कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. पण त्यानंतर 10 दिवसांनी त्याला संसर्ग झाला होता.

बातम्या आणखी आहेत...