आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'दिलदार' सोनू सूद:15 किमीचे जंगल पार करुन पायी शिक्षणासाठी जातात मुली, सोनू सूदची घोषणा - प्रत्येक मुलीपर्यंत पोहोचणार सायकल

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोनूचा मेसेज- दिवाळीच्या दिवशी फटाके नाही तर कोणाची तरी चूल पेटवा

लॉकडाऊनमध्ये हजारो प्रवासी मजुरांसाठी बसची अरेंजमेंट करणारा सोनू सूद आता मुलींना सायकल वाटणार आहे. खरेतर संतोष चौहान नावाच्या एका ट्विटर यूजनेर सोनूचे लक्ष उत्तर प्रदेशच्या मिर्जापूर आणि सोनभद्र जिल्ह्याच्या अशा हजारो मुलींकडे केंद्रित केले, ज्यांना 5 वीनंतर नाविलाजाने शिक्षण सोडावे लागले. कारण मुलींना पुढे शिक्षण घेण्यासाठी पायी 8-15 किमी, जंगलाचा रस्ता पार करावा लागतो. जो खूप असुरक्षित आहे. ट्विट पाहिल्यानंतर सोनूने उशीर न करता आश्वासन दिले की, तो गावातील प्रत्येक मुलीपर्यंत सायकल पोहोचवेल.

संतोष चौहानचे ट्विट आणि सोनू सूदचा रिप्लाय

सोनूच्या मदतीने मुलीचा जीव वाचला
शनिवारी सकाळी पीटर फर्नांडीज नावाच्या ट्विटर यूजने एका मुलीचा फोटो शेअर करत सोनू सूदला सांगितले होते की, त्यांच्या मदतीने मुलगी एकदम बरी झाली. उत्तरात सोनूने लिहिले होते की, मुलीच्या स्माइलने माझ्या दिवसाची सुरुवात चांगली केली.

वास्तविक, मुंबईतील या 10 वर्षाच्या मुलीच्या पाठीच्या कण्यामध्ये क्रॅक होता आणि ती गरीब कुटुंबातील असल्यामुळे तिच्यावर उपचार होऊ शकत नव्हते. सोनूला याची माहिती मिळताच त्याने आर्थिक मदत केली. 28 ऑक्टोबर रोजी मुलीची शस्त्रक्रिया झाली होती.

सोनूचा मेसेज- दिवाळीच्या दिवशी कोणाची चूल पेटवा

एका ट्विटर युजरने सोनू सूदला भाऊ म्हणून संबोधत त्यांच्याकडून फटाक्यांची मागणी केली होती. त्याला उत्तर म्हणून अभिनेत्याने लिहिले की, 'यावेळी दिवाळीत सर्व फटाके जाळू नका तर कोणाची तरी चूल पेटवा.'