आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Sonu Sood To Open Training School With Shantabai Pawar Who Were Showing Tricks In The Streets Of Pune An Went Viral , Ask For Her Contact Details By Sharing Video

मदतीचा हात:रस्त्यावर काठी फिरवणा-या शांताबाई पवार यांच्यासोबत सोनू सूदला उघडायची आहे प्रशिक्षण शाळा, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली 1 लाख रुपयांची आर्थिक मदत

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘मला या आजीबाईंची माहिती मिळू शकेल का?, असे ट्विट सोनू सुदने केले आहे.
  • गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शांताबाई पवार यांना मदतीचा धनादेश प्रदान केला.

कोरोना या संकटाच्या काळात उदरनिर्वाहासाठी पुण्यातील रस्त्यांवर लाठ्या-काठ्यांचा खेळ सादर करणा-या 85 वर्षीय आजीबाईंचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे. शांताबाई पवार असे या आजीबाईंचे नाव आहे. एकेकाळी त्या चित्रपटांमध्येही झळकल्या होत्या. सीता-गीता आणि शेरनी या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. मात्र हलाखीच्या परिस्थितीमुळे त्या रस्त्यावर लाठ्या-काठ्यांचा खेळ सादर करतात. पुण्यातील हडपसर या भागात राहणा-या शांताबाई यांच्या मदतीसाठी आता अभिनेता सोनू सुदने पुढाकार घेतला आहे.

एका व्यक्तीने 24 जुलै रोजी शांताबाई पवार यांचा एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला होता. तो व्हिडिओ पाहून सोनूने त्यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला. शांताबाईंच्या संपर्काचा तपशील विचारत सोनूने ट्विट केले, ‘मला या आजीबाईंची माहिती मिळू शकेल का? त्यांच्यासोबत एक छोटी प्रशिक्षण शाळा उघडायची आहे जिथे त्या आपल्या देशातील महिलांना स्वयंरक्षणासाठी काही गोष्टी शिकवू शकतील’, असे सोनू म्हणाला आहे.

  • रितेश देशमुखने पुढे केला मदतीचा हात

शांताबाई पवार यांचा व्हिडिओ व्हायरल होताच, अनेकजण त्यांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. अभिनेता रितेश देशमुखनेही त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी तपशील विचारला होता. रितेशने नंतर आणखी एक ट्विट करुन या आजीबाईंशी संपर्क झाल्याचे सांगितले.

  • गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली 1 लाख रुपयांची आर्थिक मदत

शांताबाई पवार यांचा व्हायरल व्हिडिओ गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पर्यंतही पोहोचला, त्यानंतर त्यांनी शांताबाई यांना भेट म्हणून साडी दिली आणि 1 लाख रुपयांचा धनादेश दिला. शांताबाई यांनी अनिल देशमुख यांच्यासाठी काठीचा खेळही सादर केला. याबाबत गृहमंत्री म्हणाले, "त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि मला त्यांच्याशी भेटण्याची तीव्र इच्छा होती, म्हणून आज मी त्यांना भेटायला त्यांच्या घरी आलो आहे."

कोरोना संकटाच्या काळात आपलं आणि नातंवंडांच पोट भरण्यासाठी शांताबाई पवार यांना लाठ्या- काठ्यांचा खेळ रस्त्यावर खेळावा लागत आहे. त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकजण त्यांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत.