आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनू सूद धावत्या ट्रेनच्या दारात बसला:रेल्वे प्रशासनाने केली कानउघडणी, म्हटले - तुम्ही लाखो लोकांचा आदर्श, असे करू नका

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
सोनू सूदने 13 डिसेंबर रोजी सोशल मीडियावर हा व्हिडिओ अपलोड केला होता. त्यानंतर चाहत्यांनी कारवाईची मागणी केली होती. याला रेल्वेने 3 जानेवारी रोजी उत्तर दिले.

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदचा धावत्या ट्रेनच्या दारात बसलेला व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्याचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर त्याला प्रचंड ट्रोल केले गेले. इतकेच नव्हे तर अनेकांनी सोनू सूदवर कारवाईची मागणी केली होती. आता रेल्वेने सोनूची कानउघडणी केली आहे. धावत्या रेल्वेच्या दारात बसून प्रवास करणे धोकादायक ठरू शकते. कृपया असे करू नका कारण यामुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश जाईल, असे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.

सोनू सूदने 13 डिसेंबर रोजी ट्विटर आणि फेसबुकवर एक 22 सेकंदाची क्लिप शेअर केली होती. यामध्ये सोनू सूद हा एका धावत्या ट्रेनच्या दाराशी बसेलला दिसून येत आहे. यावेळी ट्रेनचा वेगही जास्त असून सोनू ट्रेनच्या बाहेर लटकताना पाहायला मिळत आहे. याच्या बॅकग्राऊंडला 'मुसाफिर हूं यारों' हे प्रसिद्ध बॉलिवूड गाणे वाजत ऐकू येते. पण सोनूचा हा स्टंट लोकांना आवडला नाही. अनेकांनी सोनूवर टीका करुन त्याच्यावर कारवाई केली जावी अशी मागणी केली होती.

सोनू सूद तुम्ही आदर्श आहात - रेल्वे
आता रेल्वेने 3 जानेवारी रोजी सोनू सूदचे ट्वीट रिट्वीट केले आणि म्हटले, "सोनू सूद, तुम्ही देश आणि जगातील लाखो लोकांसाठी आदर्श आहात. ट्रेनमध्ये असा प्रवास करणे धोकादायक आहे, अशा प्रकारच्या व्हिडिओमुळे तुमच्या चाहत्यांमध्ये चुकीचा संदेश जाऊ शकतो. कृपया असे करू नका. सुरळीत आणि सुरक्षित प्रवासाचा आनंद घ्या," असे रेल्वेने प्रशासनाने म्हटले.

लाखो लोकांनी पाहिला हा व्हिडिओ
सोनूचा हा व्हिडिओ ट्विटरवर 6 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. शेकडो लोकांनी तो रिट्वीट केला आहे. फेसबुकवर 2 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून 4 हजारांहून अधिक लोकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. काही लोकांनी त्याला कमेंटमध्ये सावध राहण्यास सांगितले. तू लोकांचा हीरो आहेस, तुझ्याकडे आदर्श म्हणून पाहिले जाते. तू हा जीव धोक्यात घालणारा आदर्श दाखवत असशील तर लोकांनी पण हेच करावे का?, असा प्रश्न अनेकांनी सोनूला विचारला होता.

सोनू सूद मागील वर्षी ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटात झळकला होता. तामिळ चित्रपटातून त्याने आपल्या अभिनय करिअरची करण्यास सुरुवात केली. ‘जोधा अकबर’, ‘युवा’, ‘आशिक बनाया आपने, यांसारख्या हिंदी चित्रपटात त्याने काम केले आहे. खरं तर सोनू सूद गेल्या काही वर्षांत त्याच्या अभिनयापेक्षा आता सामाजिक कार्यासाठी ओळखला जातो. संपूर्ण करोना काळात त्याने देशभरातील लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत केली होती. सोनूने त्याकाळात स्वखर्चाने लाखो कामगारांना सुखरुप त्यांच्या घरी पोहचवले होते. त्याच्या या समाजकार्याचे सर्वत्र कौतुक झाले.

  • रेल्वेने कान टोचल्यानंतर सोनू सूदचा माफीनामा:गरिबांबद्दल खूप काही सांगून गेला अभिनेता, ट्वीट चर्चेत

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदचा धावत्या ट्रेनच्या दारात बसलेला व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्याचा हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर त्याला प्रचंड ट्रोल केले गेले. इतकेच नव्हे तर अनेकांनी सोनू सूदवर कारवाईची मागणी केली होती. लोकांच्या मागणीनंतर 3 जानेवारी रोजी रेल्वेने सोनूची चांगलीच कानउघडणी केली. धावत्या रेल्वेच्या दारात बसून प्रवास करणे धोकादायक ठरू शकते. कृपया असे करू नका कारण यामुळे लोकांमध्ये चुकीचा संदेश जाईल, असे रेल्वे प्रशासनाने त्याला म्हटले. रेल्वेने कान टोचल्यानंतर सोनूने आता माफी मागितली आहे. त्याने ट्वीट करत सर्वप्रथम मी क्षमा मागतो, असे म्हटले आहे. वाचा सविस्तर...

बातम्या आणखी आहेत...