आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Sonu Sood, Who Brought Laborers Home, Himself Used To Travel On A Local Train During The Days Of Struggle, A 23 Year Old Pass Went Viral.

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्हायरल:स्थलांतरित मजुरांसाठी देवदूत बनलेल्या सोनू सूदचा स्वतःचा संघर्ष, व्हायरल झाला 23 वर्षे जुना 420 रुपयांचा लोकल ट्रेनचा पास

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोनू सूदचा मुंबई लोकल ट्रेनचा पास सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

लॉकडाऊनच्या काळात अभिनेता सोनू सूद स्थलांतरीत मजुरांच्या मदतीसाठी धावून आला आहे. आतापर्यंत शेकडो परप्रांतीय मजुरांना त्यांच्या घरी सुखरुप पोहोचवण्याचे काम सोनू सूद करतोय. रुपेरी पडद्यावर खलनायक साकारणारा सोनू ख-या आयुष्यात मात्र लोकांचा हीरो झाला आहे. त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. आज जगण्यासाठी संघर्ष करणा-या मजुरांना मदतीचा हात देणा-या सोनू सूदनेही एक काळ संघर्षात घालवला आहे. अलीकडेच त्याचा मुंबई लोकल ट्रेनचा पास सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

1997 मध्ये सोनूने 420 रुपयांचा लोकल ट्रेनचा पास घेतला होता. त्यावेळी तो 24 वर्षांचा होता. हा रेल्वेचा पास सोनूच्या एका चाहत्याने सोशल मीडियावर शेअर केला आणि लिहिले, , ‘ज्या व्यक्तीने स्वत: संघर्ष केला आहे, तोच दुसऱ्यांच्या समस्यांना समजू शकतो. सोनू सूद 420  रुपयांच्या पासने लोकल ट्रेनचा प्रवास करायचा.’  विशेष म्हणजे सोनूने सोशल मीडियावर ही पोस्ट पाहिली आणि त्यावर त्याने प्रतिक्रियादेखील दिली.  'हे आयुष्य गोल आहे', असे सोनू म्हणाला आहे. 

आणखी एका यूजरला प्रतिक्रिया देताना सोनू म्हणाला, ‘मित्रा, प्रवास तर आतासुद्धा सुरू आहे. फरक फक्त इतकाच आहे की, गंतव्यस्थान बदललंय आणि या प्रवासात माझे परप्रांतीय भाऊ सहप्रवासी बनले आहेत’.

मोगा जिल्ह्यातून मुंबईत आलेल्या सोनूने करिअरच्या सुरुवातीच्या काळात बराच संघर्ष केला. त्यानंतर त्याला 1999 मध्ये एका तामिळ चित्रपटातून ब्रेक मिळाला. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. 'शहीद-ए-आजम'मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणा-या सोनूचा हा संघर्ष नक्कीच सगळ्यांसाठी एक प्रेरणा आहे.  

बातम्या आणखी आहेत...