आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्कआउट व्हिडिओ:फतेह चित्रपटासाठी सोनू सूदचा कसून व्यायाम, वर्कआउटचा व्हिडिओ केला शेअर

5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोनू सूद सध्या त्याच्या 'फतेह' या अ‍ॅक्शन चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात सोनू जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे. अलीकडे, अभिनेत्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक वर्कआउट व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो कसून वर्कआउट करताना दिसत आहे.

49 वर्षीय सोनूने अ‍ॅब्स फ्लॉन्ट केले
व्हिडिओमध्ये सोनू त्याचे टोन्ड अ‍ॅब्स फ्लॉंट करताना दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्याने कॅप्शनमध्ये 'फतेह' लिहिले आहे.

चाहते प्रभावित

सोशल मीडियावर सोनूचा हा व्हिडिओ चाहत्यांना चांगलाच आवडला आहे. व्हिडिओवर कमेंट करताना एका यूजरने लिहिले की, 'व्वा काय गोष्ट आहे सोनू जी'. तर दुसर्‍या युजरने लिहिले की, 'The fittest and kindest person in this world'.

जॅकलिनसोबत स्क्रीन शेअर करणार

'फतेह' हा चित्रपट पंजाबमधील अ‍ॅक्शन थ्रिलर आहे. फतेह चित्रपटात सोनू एका दमदार खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. सोनू सूदच्या स्वतःच्या होम प्रॉडक्शन शक्ती सागर प्रॉडक्शनच्या बॅनरखाली याची निर्मिती केली जात आहे.

या चित्रपटात त्याच्यासोबत जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप समोर आलेली नाही.