आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोनूचे पुस्तक:सोनू सूदने कोरोना काळातील अनुभवांना पुस्तक रुपात केले शब्दबद्ध, सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करुन दिली 'आय एम नो मसिहा'ची माहिती

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हे पुस्तक अॅमेझॉन आणि किंडल सारख्या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर उपलब्ध आहे.

लॉकडाऊनच्या काळात आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या लोकांसाठी अभिनेता सोनू सूद देवदूत म्हणून पुढे आला. अनेक गरजू लोकांना त्याने मदतीचा हात दिला. कशाचीही पर्वा न करता त्याने लोकांना भरभरून मदत केली. असंख्य मजुरांना सोनून त्यांच्या घरी पोहोचवले, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदतीचा हात दिला. बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला. त्याच्या या कामाचे सर्वच स्तरातून कौतुक झाले. इतकेच नाही तर सोनूने गरजूंच्या मदतीसाठी एक-दोन नव्हे तर आपल्या तब्बल आठ मालमत्ता गहाण ठेवल्या आणि त्यातून त्याने 10 कोटींचे कर्ज उभे केले. आता सोनूने लोकांची मदत करताना त्याला आलेले अनुभव पुस्तकाच्या रुपातून लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ‘आय एम नो मसिहा’ हे सोनूच्या पुस्तकाचे नाव आहे. एक व्हिडिओ शेअर करुन सोनूने त्याचे नवीन पु्स्तक वाचकांच्या भेटीला आल्याचे सांगितले आहे.

व्हिडिओ शेअर करुन सोनूने लिहिले, 'माझे पुस्तक ‘आय एम नो मसिहा’ बाजारात आले आहे. माझी स्वाक्षरी असलेले पुस्तक तुम्हाला मुंबई विमानतळ आणि BookScetra येथे मिळतील. शिवाय तुम्ही ऑनलाइनही ते ऑर्डर करु शकता. हे पुस्तक हिंदी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध आहे.' हे पुस्तक अॅमेझॉन आणि किंडल सारख्या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर उपलब्ध आहे.

सोनूचे फिल्मी करिअर
सोनू सूदने हिंदी, इंग्रजी, तेलगू, तामिळ, कन्नड, पंजाबी चित्रपटात काम केले आहे. 1999 मध्ये 'कल्लाझागर' या तामिळ चित्रपटापासून त्याने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. सोनू सूद मुळचा पंजाबचा असून गेल्या काही वर्षांपासून तो मुंबईत राहतोय. सोनूने नागपूरच्या इंजिनिअरींग महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनतर त्याने मॉडेलिंग आणि चित्रपटात काम करण्यासाठी मुंबई गाठली. त्यावेळी नोकरी करून सोनू चित्रपटात संधी मिळवण्यासाठी धडपड करत होता. पण पहिली संधी सोनूला एका जाहिरातीसाठी दिल्लीत मिळाली. त्यानंतर त्याने तामिळ चित्रपटात एक भूमिका केली. शिवाय त्याने तामिळ, तेलगू, कन्नड या चित्रपटांमध्ये अभिनयाला सुरुवात केली. त्यासाठी या भाषा त्याला शिकाव्या लागल्या. 2002 साली 'शहिद-ए-आझम' या हिंदी चित्रपटातून सोनूने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. युवा,आशिक बनाया आपने, शूट आऊट अॅट वडाला, जोधा अकबर, दबंग, हॅप्पी न्यू ईयर, पलटन, आर राजकुमार या हिंदी चित्रपटांमध्ये त्याने काम केले.

बातम्या आणखी आहेत...