आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोनू सूदचा खास मेसेज:15 ऑगस्टला देशभक्ती दाखवणाऱ्यांसाठी सोनूचा खास संदेश, म्हणाला - ‘आता खरी देशभक्ती दाखवायची वेळ आली..’

23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोनू सूदला मागील आठवड्यात कोरोनाचा संसर्ग झाला होता.

कोरोनाच्या दुस-या लाटेने देशात अक्षरशः हाहाकार माजवला आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. सर्वत्र औषधे, बेड्स, ऑक्सिजनचा अभाव बघायला मिळतोय. गुरुवारी रात्री उशिरा सर गंगाराम रुग्णालय या दिल्लीतील सर्वात मोठ्या रुग्णालयात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे 25 रुग्णांचा मृत्यू झाला. अशीच स्थिती जबलपूरच्या गॅलेक्सी रुग्णालयातही निर्माण झाली. तेथे ऑक्सिजनच्या पुरवठ्यात अडथळा आल्याने पाच रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनाने असे आक्राळविक्राळ रुप धारण केले असतानाचा महाराष्ट्रात एकापाठोपाठ एक संकटांची मालिका सुरु आहे. नाशिकमध्ये ऑक्सिजनच्या गळतीच्या दुर्घटनेत 25 पेक्षा जास्त कोरोना रुग्णांचा बळी गेला. तर या घटनेला 48 तास उलटत नाही तोच विरार येथील विजय वल्लभ या खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये एसीचा प्रचंड मोठा स्फोट होऊन लागलेल्या भयंकर आगीत 14 कोरोना रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला. अशा कठीण परिस्थितीत अभिनेता सोनू सूद सगळ्यांची मदत करण्यासाठी पुन्हा एकदा समोर आला आहे. एवढंच नाही तर तो सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना प्रेरित करतोय.

सोनू सूदने सोशल मीडियावर एक ट्विट केले आहे. यात त्याने स्वत:ला देश भक्त म्हणणाऱ्या लोकांना संबोधित केले आहे. ‘15 ऑगस्टला देशभक्ती दाखवणाऱ्यांसाठी संदेश…देशासाठी काही करण्याची आणि देशभक्ती दाखवण्याची याहून चांगली संधी कधी मिळणार नाही,’ असे सोनूने म्हटले आहे. फक्त एक दिवस देशभक्ती दाखवून काहीच होणार नाही. तर आता खरी देशभक्ती दाखवायची वेळ आली असल्याचे त्याने या ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे.

सोनू सूदला मागील आठवड्यात कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर आता सहा दिवसांनी त्याचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. सोनूने स्वतः सोशल मीडिया अकाउंटवरुन याबद्दल पोस्ट केली आहे. यात त्याने आपला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याने मास्क परिधान केला आहे. तसेच हाताने निगेटिव्ह साईन करत पोझ दिली आहे. त्याने या फोटोला ‘कोरोना अहवाल निगेटिव्ह आला’ असे कॅप्शनही दिले आहे.

कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर सोनू सूद घरीच क्वारंटाइन होता. याकाळात तो लोकांच्या मदतीसाठी सतत काम करत होता. सोनू आणि त्याची टीम रुग्णांना बेड्स, औषध तसेच ऑक्सिजन मिळून देण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, जेवढ्या लोकांनी मदतीसाठी कॉल केले, त्यापैकी काही जणांनाच तो याकाळात मदत करु शकतोय, अशी खंत देखील त्याने व्यक्त केली आहे.

बातम्या आणखी आहेत...