आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमिताभ बच्चननंतर त्यांचा मुलगा अभिषेक बच्चनची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली आहे. यानंतर अभिषेक ज्या ठिकाणी डबिंग करण्यासाठी जात होता. तो स्टूडिओ अस्थाई स्वरुपात बंद करण्यात आला आहे. येथे अभिषेक आपली वेब सीरीज 'ब्रेथ: इंटू द शॅडो'च्या डबिंगसाठी जात होता. ट्रेड एनालिस्ट कोमल नाहटा यांनी ट्विटवर ही बातमी दिली आहे.
नाहटा यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले आहे - काही दिवसांपूर्वी अभिषेकने 'ब्रीथ: इनट द शेडो' या वेब सीरीजची डबिंग साऊंड अँड व्हिजन डबिंग स्टुडिओत केली होती. यामुळे स्टूडिओ तात्पुरता बंद झाला आहे.
Sound N Vision dubbing studio closed temporarily as Abhishek Bachchan had, just a few days back, dubbed there for his web series, ‘Breathe: Into The Shadows’.
— Komal Nahta (@KomalNahta) July 11, 2020
अमिताभ यांचा जनक बंगला सील
बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) ने अमिताभ यांचा जनक हा बंगला सील केला आहे. या बंगल्यात अमिताभ यांचे ऑफिस आहे. बिग बी हे कुटुंबासह जलसामध्ये राहतात. रविवारी बीएमसीने जलसा बंगला सेनिटाइज करुन कंटेंटमेंट झोन घोषित केला आहे.
अभिषेक डबिंगसाठी गेला होता
गेल्या काही दिवसांपासून अमिताभ घराबाहेर पडलेले नाहीत. तीन दिवसांपूर्वी अभिषेक एका डबिंग स्टुडिअोत गेला होता त्या वेळी अनेक लोकांना भेटला. अभिषेक हा वेब सीरीजची डबिंगसाठी स्टूडिओमध्ये जात होता.
अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण
महानायक अमिताभ बच्चन व त्यांचे पुत्र अभिषेक बच्चन यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. दोघांना शनिवारी रात्री मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 77 वर्षीय अमिताभ यांनी रात्री 10.52 वाजता ट्विट करून ही माहिती दिली. अमिताभ हे कोरोनाविरुद्धच्या लढ्यात भारत सरकारचे ब्रँड अॅम्बेसेडर आहेत. त्यांना लागण झाल्यानंतर कुटुंबीय व कर्मचाऱ्यांच्याही चाचण्या घेण्यात आल्या.
जया बच्चन, एेश्वर्या व आराध्या यांचे अहवाल निगेटिव्ह
जया बच्चन, एेश्वर्या व आराध्या यांचे अहवाल निगेटिव्ह आले. अमिताभ आणि अभिषेक यांच्यात कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. त्यांना किंचितसा ताप व खाेकला आहे. दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाने सांगितले. अमिताभ म्हणाले, ‘मी काेराेना पॉझिटिव्ह आहे. रुग्णालयात दाखल झालो आहे. 10 दिवसांत जे कुणी माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी चाचण्या करून घ्याव्यात ही विनंती.’
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.