आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूड आणि ड्रग्ज प्रकरण:सूत्रांचा दावा - दीपिकाने तिच्या आणि मॅनेजरमध्ये झालेल्या ड्रग चॅटची दिली कबुली, डुप नावाची विशिष्ट प्रकारची सिगारेट ओढल्याचेही केले मान्य; अनेक प्रश्नांवर राहिली गप्प

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दीपिकाचे आगमन झाल्यानंतर एनसीबीने सर्वप्रथम तिला तिच्यावर असलेल्या आरोपांबद्दल सांगितले.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणातून बॉलिवूडमधील ड्रग्ज अँगल समोर आले आहे. त्यानंतर आज बॉलिवूडच्या नावाजलेल्या तीन अभिनेत्रींची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून चौकशी सुरु आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान आज चौकशीसाठी एनसीबीच्या ऑफिसमध्ये पोहोचल्या आहेत.

आज सर्वप्रथम सकाळी 9.50 वाजता दीपिका चौकशीसाठी एनसीबीच्या कुलाबास्थित ऑफिसमध्ये हजर झाली. तिची अद्याप चौकशी सुरु आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दीपिकाने तिची मॅनेजर करिश्मा प्रकाश आणि तिच्यात झालेल्या ड्रग्ज चॅटची कबुली दिली आहे. दोघींमधील ड्रग चॅट हे 2017 मधील आहेत.

  • दीपिकाने ड्रग्ज चॅटबद्दल दिली कबुली

रिपोर्ट्सनुसार, एनसीबीने चौकशीदरम्यान दीपिकाला तिची मॅनेजर करिश्मा समोर काही प्रश्न विचारले आहेत. ‘टाइम्स नाऊ’ने दिलेल्या वृत्तानुसार एनसीबी करत असलेल्या चौकशीमध्ये दीपिकाने, ज्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये माल है क्या असे म्हणत ड्रग्जची मागणी केली गेली होती त्या चॅटचा ती एक भाग असल्याचे कबुल केले आहे. मात्र ड्रग्जचे सेवन केल्याचे नाकारले आहे. रिपोर्ट्सनुसार, एनसीबीच्या हवाल्याने दावा केला जातोय की, दीपिकाने एका विशिष्ट प्रकारची सिगारेट ओढल्याचे कबूल केले आहे.

  • दीपिकाने सांगितले- संपूर्ण ग्रुप डूप घेतो

दीपिकाने एनसीबीला सांगितले की तिचा संपूर्ण ग्रुप डूप घेतो, जी एक खास प्रकारची सिगारेट आहे. त्यात ब-याच गोष्टी असतात. रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जातोय की, जेव्हा एनसीबीने दीपिकाला चॅटमधील वीड आणि हॅशिश या शब्दांबद्दल विचारले तेव्हा तिने त्याचे स्पष्ट उत्तर दिले नाही. डूपमध्ये ड्रग्जचे प्रमाण असते का, असा प्रश्न दीपिकाला विचारला असता तिने मौन बाळगले, अशीही माहिती समोर आली आहे.

  • दीपिकाला प्रश्नोत्तराचे 3-4 राऊंड असू शकतात

सूत्रांच्या माहितीनुसार, दीपिकाचे आगमन झाल्यानंतर एनसीबीने सर्वप्रथम तिला तिच्यावर असलेल्या आरोपांबद्दल सांगितले. तिचा डेटा बॅकअप घेण्यासाठी दीपिकाचे 2 मोबाइल फोन घेण्यात आले होते. तिला या प्रकरणातील कोणत्याही संशयित किंवा आरोपीशी बोलू नका असे सांगण्यात आले. त्यानंतर एका अंडरटेकिंगवर तिची सही घेण्यात आली. 3 टप्प्यांत चौकशी केली जाईल, असे तिला सांगण्यात आले. यासाठी 3-4 राऊंड असू शकतात.

दीपिकाला विचारले जाऊ शकतात हे पाच प्रश्न -

  • तुम्ही ड्रग्ज खरेदी केले आहेत का? केले असतील तर कसे आणि कुठून?
  • तुमचा मोबाइल नंबर कन्फर्म करा. करिश्मा प्रकाश आणि जया साहासोबत 2017 ची चॅट तुमची आहे की नाही?
  • तुम्ही करिश्माला कधीपासून ओळखता? तुमची आणि त्यांची भेट कशी झाली, सर्व सविस्तर सांगा?
  • तुम्ही कधी त्यांना ड्रग्ज मागवण्याविषयी म्हटले होते का? तुम्ही त्यांना कितीवेळा ड्रग्ज खरेदी करण्यास सांगितले? तुम्ही ड्रग्ज स्वतःसाठी खरेदी केले की, दुसऱ्यासाठी?
  • तुम्ही करिश्माला पेमेंट केले होते? जर केले असेल तर त्याचे माध्यम काय होते? कोको रेस्तराँच्या पार्टीमध्ये गेल्या होत्या, त्या पार्टीत ड्रग्जचा वापर झाला होता का?

दीपिका ठरवलेल्या वेळेपेक्षा 10 मिनिटांपूर्वीच पोहोचली होती

सूत्रांनुसार दीपिका आणि रणवीर रात्री ताज हॉटेलमध्ये थांबले होते. मीडियापासून बचाव करण्यासाठी दीपिका छोटी गाडी घेऊन हॉटेलमधून बाहेर पडली होती. तर रणवीर दुसऱ्या कारमध्ये थोडा दूरपर्यंत दीपिकासोबत आला होता.

ड्रग्ज प्रकरणात कसे समोर आले दीपिकाचे नाव ?

बॉलीवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक तारे-तारकांशी जुळलेल्या ‘क्वान टॅलेंट मॅनेजमेंट’ कंपनीची कर्मचारी करिश्मा प्रकाश या तरुणीच्या चौकशीनंतर एनसीबीने दीपिकाला समन्स जारी केले होते. दीपिकाचे 28 ऑक्टोबर 2017 रोजीचे चॅट समोर आले होते. त्यात दीपिकाने करिश्मा प्रकाशसोबत ड्रग्जसंदर्भात चर्चा केली होती. त्यात दीपिकाने हॅश आणि वीड या शब्दांचा वापर केला होता. माल आहे का? असा प्रश्न तिने करिश्माला विचारला होता. त्यावर करिश्माने हो असे उत्तर दिले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, या व्हॉट्सअॅप ग्रुपची अॅडमिन स्वतः दीपिका होती. काही महिन्यांपूर्वीच हा ग्रुप डिलीट करण्यात आला असून यात इंडस्ट्रीतील 12 लोक अॅड होते.

बातम्या आणखी आहेत...